नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाद्वारे नव्याने बस सुरु करण्यात आले आहे. या बसेस विविध मार्गावर धावणार आहेत. यामुळे नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सदर मार्गावरील फेऱ्यांचे वेळापत्रक खालील प्रमाणे राहणार आहेत.
मोरभवन ते तितूर रेल्वे स्टेशन (कुचाडी, तितूर, चितापूर )या दरम्यान नव्याने बस सेवा सकाळी 6:00, 10:45 वाजता, तर दुपारी 1:05वाजता सुटणार आहेत. तितूर रेल्वेस्टेशन ते मोरभवन या दरम्यान सकाळी 7:40, 12:25, 2:40 वाजता बस सुटणार आहे.
मोरभवन ते मंगरूळ ( डोंगरगाव मार्गे ) या दरम्यान सकाळी 9:15, 16:45 वाजता बस सुटणार आहेत. मंगरूळ ते मोरभवन दरम्यान बस सकाळी 10:20 आणि सायंकाळी 6:00 वाजता बस सुटणार आहेत.
मोरभवन ते वडेगाव काळे ( पाचगाव मार्गे ) या दरम्यान सकाळी 5:15, 7:45, 10:30 वाजता बस सुटणार आहे तर दुपारी 4.00 वाजता बस सुटणार आहे.
वडेगाव काळे ते मोरभवन या दरम्यान सकाळी 6:15, 9:15 वाजता तर दुपारी 12:00 आणि सायंकाळी 5.30 वाजता बस सुटणार आहेत.
मोरभवन ते खड्गाव ( फेटरी, चिंचोली मार्गे ) या दरम्यान बस सकाळी
6:30, 7:30, 8:30, 09:30, 10: 50, 11:50, दुपारी 2:30, 3:30, 4:30, 5:50, 6:50, 7:50 वाजता बस सुटणार आहेत.
खड्गाव ते मोरभवन या दरम्यान बस सकाळी 7.30,8:30,9:30, 10:30, 11:50, दुपारी 12:50,3:30, 4:30,5:30, 6:50, 7:50 आणि 10:50 वाजता बस सुटणार आहेत.
मोरभवन ते नितनवरे लॉन ( दाते ले-आऊट ) या दरम्यान बस दुपारी 12:00आणि सायंकाळी 6:00 वाजता सुटणार आहेत. नितनवरे लॉन ते मोरभवन या दरम्यान बस सकाळी 7:00 वाजता, दुपारी 12:40 आणि सायंकाळी 6:40 वाजता सुटणार आहेत.