नागपूर :- उष्णतेच्या लाटेमुळे पशु- पक्ष्यांना पाणी पिण्याकरिता नागरिकांनी घराच्या छतावर किंवा घराच्या समोरच्या मोकळ्या जागेमध्ये मातीचे भांडे ठेवण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हाळया मध्ये पशु-पक्षांना पाण्यची टंचाई भासते. त्यामुळे नागरीकांनी त्यांच्या घरासमोरील परिसरात, घराच्या छतावर किंवा बालकनीमध्ये मातीचे भांडयामध्ये पाणी भरुन ठेवावे. नागरीकांनी मोकाट जनावराकरिता ज्यांच्या घरासमोर मुबलक जागा उपलब्ध असल्यास व सदर जागेपासुन वाहतुकीला,रहदारीला अडचण निर्माण होणार नाही अशा ठिकाणी जनावरासाठी पिण्याच्या पाण्याकरिता हौद, टाकीची व्यवस्था करावी. नागरीकांनी उपाययोजना केल्यास उष्माघातामुळे पशु व पक्ष्यांचा उष्माघाताने मृत्यू होणार नाही यासाठी नागपुरातील नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त विजय देशमुख यांनी केले आहे.