मनपातर्फे मालमत्ता धारकांना शास्तीत सवलत जाहीर,ऑनलाईन ५० टक्के तर ऑफलाईन ४५ टक्के

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शास्तीत सवलत देण्यात येत असुन २ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकास ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास ५० टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास ४५ टक्के शास्तीत सवलत देण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च पर्यंत थकबाकीसह पूर्णत कराचा भरणा करण्याऱ्या मालमत्ता धारकांना ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास २५ टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास २२ टक्के शास्तीत सूट देण्यात येणार आहे. तसेच सन २०२४-२०२५ या वर्षामध्ये माहे डिसेंबर २०२४ पर्यंत ज्या मालमत्ता धारकांनी शास्तीचा भरणा केलेला आहे त्यांचे ५० टक्के शास्तीची रक्कम पुढील आर्थिक वर्षात समायोजित करण्यात येणार आहे .

महापालिका क्षेत्रात ८० हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करण्यात येते. कर न भरल्यास दंड वसुली तसेच प्रसंगी मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढुन कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर किरकोळ खर्च पालिकेला स्वतःच्या उत्पन्नातून भागविण्याचे दृष्टीने मालमत्ता कराची वसुली नियमित व प्रभावी होण्याकरीता शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये सुधारणा करून विहित कालावधीनंतर शास्ती लागु करण्याची तरतूद केलेली आहे. अश्या प्रकारे लागु होणाऱ्या शास्तीमध्ये पुर्णतः किंवा अंशतः सूट देण्याचे अधिकारी महानगरपालीकेस आहेत.

मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीकरीता व संभाव्य उद्दिष्ट पूर्ती करीता मनपातर्फे शास्तीत सवलत जाहीर करण्यात आली आहे. या शास्ती माफीचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार

Sun Jan 12 , 2025
नवी दिल्ली :- मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार असल्याची माहिती, पानिपत शौर्य समितीचे आयोजक प्रदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना  पाटील यांनी सांगितले, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस प्रथमतःच हरियाणा राज्यात असलेल्या पानिपत येथील शौर्य स्मारकाला 14 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात येणार आहेत. 14 जानेवारीला पानिपतच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!