नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरूवारी (ता.२१) धंतोली झोन कार्यालयाची पाहणी केली. यावेळी झोनचे सहायक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता उज्ज्वज धनविजय, कार्यकारी अभियंता सुनिल उईके, सहायक अधीक्षक विकास रायबोले, उपअभियंता प्रफुल्ल आसलकर, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे आदी उपस्थित होते.नागपूर महानगरपालिकेच्या धंतोली झोन कार्यालयामधील सर्व विभाग आणि व्यवस्थेचा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आढावा घेतला. झोन कार्यालयामध्ये असलेल्या मनपा आणि पोलिस विभागांचे श्रीगणेश परवानगी मदत केंद्राद्वारे आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या मंडळांची माहिती यावेळी आयुक्तांनी घेतली. कर संकलनासाठी कर विभागाद्वारे करण्यात येणा-या प्रक्रियेची तसेच मालमत्ता कर धारकांना मालमत्ता कराची डिमांड पाठविल्याबद्दल देखील त्यांनी माहिती घेतली. जन्म-मृत्यू विभाग, आरोग्य विभाग यासह अन्य सर्व विभागांचे कार्य आणि मनुष्यबळ या सर्वांची सविस्तर माहिती यावेळी आयुक्त डॉ. चौधरी यांनी घेतली.झोन कार्यालयामध्ये आवश्यक कामे तसेच सर्वसामान्य नागरिकांना अधिक सोप्या आणि सजतेने कर यंत्रणेचा उपयोग व्हावा यादृष्टीने काही बाबी अंतर्भूत करण्याचे निर्देश देखील यावेळी आयुक्तांनी दिले. त्यांनी झोनमधील विविध विभागाच्या कर्मचा-यांशी संवाद साधून कामाची पद्धती आणि येणा-या अडचणी जाणून घेतल्या.