मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारीला उद्घघाटन

– १२ व १३ फेब्रुवारीला ग्रंथदिडी, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री, चर्चासत्र व मार्गदर्शन भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई :- मुंबई उपनगर ग्रंथोत्सव २०२४चे पालकमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड्. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुलूंड पश्चीम येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात उद्धघाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तर प्रमुख उपस्थिती कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह-पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची असणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर, समन्वय समिती व जिल्ह्यातील सर्व शासन मान्य ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ग्रंथदिडी, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथ विक्री व विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

ग्रंथदिडी

दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ग्रंथदिंडीचा कार्यक्रम ९ ते १०.३० या वेळेत आहे. ग्रंथदिंडीचे उद्धघाटन आमदार मिहिर कोटेचा यांच्या हस्ते व मुंबई उपनगरचे जिल्हा नियोजन अधिकारी संजय कुमार शिंदे, मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, प्रशासकीय अधिकारी, टी वॉर्ड, कैलास चंद्र आर्य, सहायक डॉ. विजयकुमार जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

उद्घाटन कार्यक्रम

या ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, ग्रंथालय इमारत मुलुंड (पश्चीम) येथे उद्धघाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, लोकसभा सदस्य वर्षा गायकवाड, संजय दीना पाटील, विधानसभा सदस्य राम कदम, सुनिल राऊत, मंगेश कुडाळकर, मिहिर कोटेचा, पराग शहा, अशोक पाटील तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महापालिकेच्या उपायुक्त्‍ शिक्षण डॉ. प्राची जांभेकर, पोलिस उपायुक्त विजयकांत सागर, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुजाता खरे, कार्यकारी अभियंता सचिन धात्रक, प्र. ग्रंथपाल शालिनी इंगोले हे उपस्थित राहणार आहेत.

चर्चासत्र व मार्गदर्शन

१२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सत्रात ‘मराठीतील पहिले ज्ञानपीठ’ या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक चंद्रकांत भोंजाळ, प्रसिद्ध साहित्यिक चांगदेव काळे, प्रसिद्ध समीक्षक आणि लेखक डॉ. अनंत देशमुख यांचे दुपारी १२.३० ते १.१५ या विषयावर मार्गदर्शन. दुपारी २ ते २.३० यावेळेत कुमारी सई विकास खंडाळे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र’ या विषयावर व्याख्यान, तर दुपारी २.३० ते ३.१५ या वेळेत ‘राज्य सेवा आयोग व लोक सेवा आयोग स्पर्धा परीक्षांविषयक मार्गदर्शन’ या विषयावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव अभिजीत लेंडवे, उषा प्रविण गांधी कला व विज्ञान महाविद्यालयाचे श्रीराम देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी ३.३० ते ४.३० ‘अभिजात मराठीतील शब्द वैभव’ या विषयावर दूरदर्शनच्या निवेदिका दिपाली केळकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच लहान मुलांचा सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १३ फेब्रुवारी रोजी ‘कथा कवितेच्या राज्यात’ या विषयावर सकाळी १० ते ११.१५ वाजेपर्यंत बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे सादरीकरण. ‘भारतीय संविधान माझा अभिमान’ या विषयावर संविधानाचे लेखक आणि अभ्यासक सुरेश सावंत यांचे सकाळी ११.३० ते १२.१५ या वेळेत व्याख्यान. तर दुपारी १२.३० ते १.१५ येथे ‘लोककला समुजन घेताना’ या विषयावर श्रीमती डॉ. मोनिका ठक्कर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी २ ते २.४५ या वेळेत ‘आधुनिक शेती’ या विषयावर कृषीतज्ज्ञ दिलीप फुके, मालाड येथील श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालयाचे प्रवीण मालोडकर यांचे ‘कोवळ्या पालेभाज्या’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.४५ ते ४.१५ या वेळेत ‘संत साहित्य गाण्यामधून’ या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ चांभई यांचा कार्यक्रम होणार आहे. तर कार्यक्रमाचा समारोप लेखक रमेश नागपुरे यांच्या उपस्थितीत दुपारी ४.१५ ते ५ या वेळेत होईल.

या कार्यक्रमाला ग्रंथप्रेमी, वाचनप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर संजय बनसोड यांच्यासह ग्रंथोत्सव समन्वय समिती व संयोजन सहाय्य समिती यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जय महाराष्ट्र' कार्यक्रमात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुलाखत

Mon Feb 10 , 2025
मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसाच्या कामकाजाच्या अनुषंगाने तसेच सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 11 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!