नासुप्र येथे श्रीमती इंदिरा गांधी यांची १०४वी जयंती साजरी

नागपूर-  भारताच्या पहिल्या व एकमेव महिला पंतप्रधान ‘भारतरत्न’, ‘शक्ती स्वरूप’ श्रीमती इंदिरा गांधी (१९ नोव्हेंबर १९१७ – ३१ ऑक्टोबर १९८४) यांची १०४वी जयंती आज शुक्रवार, दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. नासुप्रचे महाव्यवस्थापक श्री. निशिकांत सुखे यांच्याहस्ते श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी आस्थापना अधिकारी श्री. योगीराज अवधूत, सचिव 2 श्री. प्रवीण डेकाटे तसेच नासुप्रचे व नामप्रविप्रा इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक

Sat Nov 20 , 2021
चंद्रपूर, ता. १९ : विविध स्पर्धामध्ये यशस्वी ठरलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोसत्वानिमित्त विधी प्राधिकरण चंद्रपूरतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत मनपाच्या शाळांमधील कृणाली बुधबावरे (वर्ग ६वा), निबंध स्पर्धेत त्रिशा दुर्योधन (वर्ग ९वा) यांनी यश प्राप्त केले. हैद्राबाद येथील कराटे स्पर्धेत शितल बंडू मेश्राम (वर्ग ८वा) हिला गोल्ड मेडल मिळाले. त्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी (माध्यमिक) मनोज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com