श्री गणेशोत्सवानिमित्त विदर्भ स्तरीय भव्य ‘भजन रंग’ स्पर्धा

– श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे आयोजन : ७ सप्टेंबरपर्यंत नोंदणीचे आवाहन

नागपूर :- श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, झिल्पी, मोहगांव च्या वतीने यंदा श्री गणेशोत्सवानिमित्त विदर्भ स्तरावरील आगळ्या वेगळ्या भव्य ‘भजन रंग’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ आणि १६ सप्टेंबर रोजी लक्ष्मीनगर आठ रस्ता चौक येथील सायंटिफिक सभागृहामध्ये ही स्पर्धा पार पडेल. स्पर्धेसाठी नोंदणी करण्याकरिता ७ सटेंबर ही शेवटची तारीख असून जास्तीत जास्त भजन मंडळांनी नोंदणी करावे, असे आवाहन श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

येत्या ७ सप्टेंबरला श्री गणेशाचे आगमन होत आहे. श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगांने विदर्भातील भजन मंडळांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उदात्त हेतूने श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, झिल्पी, मोहगांव यांच्या वतीने महत्वाचा पुढाकार घेण्यात आलेला आहे. विदर्भ स्तरावरील भजन स्पर्धेमुळे आपली संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी झटणाऱ्या विविध भागातील कलावतांच्या गुणांना वाव मिळणार आहे. याशिवाय स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिक जिंकण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे.

विदर्भ स्तरीय भव्य ‘भजन रंग’ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या भजन मंडळाला ३१ हजार रुपये, द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या भजन मंडळाला २१ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या भजन मंडळाला ११ हजार रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय ५ हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे देखील देण्यात येणार आहेत. महत्वाचे म्हणजे, स्पर्धेच्या अनुषंगाने ११ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देखील प्रदान करण्यात येणार आहे. हे विशेष पारितोषिक कशासंदर्भात असेल हे स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगीच घोषीत करण्यात येणार आहे.

स्पर्धेमध्ये नोंदणी करण्यासाठी ७ सप्टेंबर २०२४ ही अंतिम तारीख आहे. नोंदणी दरम्यान स्पर्धेच्या अटी व शर्ती देखील स्पर्धकांना कळविण्यात येतील. स्पर्धेची नोंदणी आणि अधिक माहितीकरिता सौ. कल्पना सातपुते यांच्याशी 9371443504 या क्रमांकावर संपर्क साधावा. विहित कालावधीत जास्तीत जास्त भजन मंडळांनी या आगळ्या वेगळ्या स्पर्धेकरिता नोंदणी करावी, असेही आवाहन सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गरीब मुलींना शिक्षणात पुढे जाण्यास ‘..लाडकी बहीण योजना’ ठरली पूरक

Thu Aug 29 , 2024
नागपूर :- दुर्गम भागातील गोरगरीब मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी उच्च शिक्षण घेऊन कुटुंब व गावाचे नाव उंचविण्याच्या स्वप्नाला पंख देण्याचे कार्य ‘मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून घडत आहे. याचा अनुभव रामटेक तालुक्यातील पेंच अभयारण्य परिसरातील सिल्लारी या अत्यल्प लोकवस्तीच्या गावात राहणाऱ्या धनश्री मरसकोल्हे यांनी कथन केला. दुर्गम गावापासून बऱ्याच लांब असलेल्या नागपूर येथे पॅरामेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या धनश्रीला रक्षाबंधनाच्या दिवशी या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com