मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय खजिनदार पदी ज्येष्ठ नेते खासदार सुनिल तटकरे यांची राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ वा वर्धापन दिन राज्यासह देशभरात साजरा करण्यात आला. याचवेळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली. शिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांची राष्ट्रीय खजिनदार पदी नियुक्ती जाहीर केली आहे. तसे नियुक्तीपत्र खासदार सुनिल तटकरे यांना देण्यात आले आहे.
पक्षाची प्रदेशाध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळल्यानंतर खासदार सुनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे आणि आता आणखी एक महत्त्वाची जबाबदारी देऊन सुनिल तटकरे यांच्या कामाला शरद पवार यांनी पोचपावती दिली आहे.