नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पेतून नवीन वर्षात ५ व्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन उद्या शुक्रवारी ९ डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता देवदत्त नागो यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवारी (ता.९) सीताबर्डी येथील ग्लोकल स्क्वेअर मॉलमध्ये दुपारी ४ वाजता होणा-या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नागपूर शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार नागो गाणार, आमदार समीर मेघे, आमदार टेकचंद सावरकर यांची उपस्थिती असेल.
नागपूर शहरातील खेळाडूंसह असंख्य क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असणारा नागपूरच्या क्रीडा क्षेत्राचा उत्सव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवाचे नव्या वर्षात आयोजन होत आहे. महोत्सवासंबंधी तयारी, खेळाडूंना आवश्यक माहिती आणि मदतीसाठी महोत्सवाच्या कार्यालयाची महत्वाची भूमिका असते. कार्यलयाचे उद्घाटन जय मल्हार या टिव्ही मालिकेसोबतच तानाजी, ब्रम्हास्त्र या बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारे अभिनेते देवदत्त नागो गाणार यांच्या हस्ते होत आहे. या समारंभाला शहरातील क्रीडा संघटना, प्रशिक्षक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सव समितीचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
महोत्सवाच्या आयोजनासाठी खासदार क्रीडा महोत्सव आयोजन समितीचे पीयूष आंबुलकर, डॉ. पद्माकर चारमोडे, डॉ. संभाजी भोसले, आशिष मुकिम, अश्फाक शेख, सचिन देशमुख, डॉ. विवेक अवसरे, नागेश सहारे, प्रकाश चांद्रायण, अमित संपत, सतीश वडे, लक्ष्मीकांत किरपाने, सुनील मानेकर, सचिन माथने, विनय उपासनी, , विशाल लोखडे, संदेश खरे, सौरभ मोहोड आदी सहकार्य करीत आहेत.