नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन झाले. संगम टॉकीज जवळील बास्केटबॉल मैदानात ही स्पर्धा सुरू असून तलवारबाजी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कन्वेनर लक्ष्मीकांत किरपाने, समन्वयक महेश महाडीक, नागपूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे मोहम्मद शोयब, अजय सोनटक्के, राहुल मांडवकर यांच्यासह मोठ्या संख्येत खेळाडू आणि नागरिकांची उपस्थिती होती.