प्रथमेश गुप्ते खासदार श्री , विशाल सिन्हा बेस्ट पोजर
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वातील शरीर सौष्टव स्पर्धेत पिंपरी चिंचवड येथील प्रथमेश गुप्ते ‘खासदार श्री 2023’ चा मानकरी ठरला. 70 किलो वजनगटातून प्रथमेशने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. तर कोल्हापूर येथील विशाल सिन्हा बेस्ट पोजर ठरला.
रविवारी (ता.15) रेशीमबाग मैदानात झालेल्या शरीर सौष्टव स्पर्धेतील विजेत्यांना खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक तथा नागपूर बॉडिबिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी, महाराष्ट्र बॉडिबिल्डर्स असोसिएशनचे सचिव राजेंद्र सातपुरकर, भारतीय बॉडिबिल्डर्स असोसिएशनचे कोषाध्यक्ष राजेश सावंत, विदर्भ बॉडिबिल्डर्स असोसिएशनचे सचिव अभिषेक कारिमवार, उपाध्यक्ष अविनाश लोखंडे, कोषाध्यक्ष दिनेश चावरे स्पर्धेचे कन्वेनर डॉ. पीयूष आंबुलकर, समन्वयक नरेंद्र (बाल्या) बोरकर, सुधीर दिवे, सुधीर अभ्यंकर, अविनाश वाघुले, अभिषेक कर्णीगवार आदी उपस्थित होते.
निकाल
खासदार श्री 2023 – प्रथमेश गुप्ते (पिंपरी चिंचवड)
बेस्ट पोजर – विशाल सिन्हा (कोल्हापूर)
(प्रथम, द्वितीय व तृतीय)
वजनगट – 55 किलो
आशिष बिरिया (चंद्रपूर), हनुमान भगत (रायगड), गितेश मोरे (रायगड)
वजनगट – 60 किलो
गणेश पाटील (रायगड), जयेश कदम (पालघर), प्रतिक महाजन (रायगड)
वजनगट – 65 किलो
अभिषेक पवार (मुंबई), कुणाल करवीर (ठाणे), सलिम शेख (अकोला)
वजनगट 70 किलो
प्रथमेश गुप्ते (पिंपरी चिंचवड), महेंद्र गायकवाड (रायगड), सुयेश पांडेय (अकोला)
वजनगट 75 किलो
उदय घेवरे (रायगड), रोहित मुरूडकर (मुंबई), विशाल सिन्हा (कोल्हापूर)
वजनगट 80 किलो
प्रशांत खन्नुकर (कोल्हापूर), स्वप्नील अधाईल (पालघर), हर्षल यावळे (अमरावती)
वजनगट 85 किलो
भारत बोदडे (नागपूर), हरपाल राजपूत (धुळे), अमित साटम (मुंबई)
वजनगट 85 किलोवरील
विजय भोयर (अमरावती), आकाश राजपूत (अमरावती), सर्वेश शाहु (अमरावती)