नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवातील बॅडमिंटन स्पर्धेत रिद्धी तिडके, अमेय नाकतोडे व गौरव रेगेने विजेतेपदाचा दुहेरी मुकुट पटकाविला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुभेदार हॉलमध्ये ही स्पर्धा झाली.
विजेत्यांना माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे मंगेश काशीकर, स्पर्धेचे कन्वेनर सचिन देशमुख, समन्वयक निशांत गांधी, संजय लोखंडे, चेतन खेडीकर, आदित्य गलांडे आदी उपस्थित होते.
१३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत रिद्धीने वैष्णवी मांगलेकरला १४-२१, २३-२१, २१-१३ आणि दुहेरीत रिद्धी व सान्वी घाटे या जोडीने अवनी झाडगावकर व सारा पेशकर या जोडीला २१-७, २१-५ असे पराभूत केले. १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अमेयने प्रियांशू दुबेला २१-११, २१-९ आणि दुहेरीत अमेय व प्रणय गडेवार या जोडीने जिवा पिल्लई व स्पर्श कावळेला २१-१५, २१-१४ असे नमविले. पुरुष एकेरीत गौरवने गंधार नेवलेला २१-९, १३-२१, २१-१४ आणि दुहेरीत गौरव व गंधार नेवले या जोडीने ममन गोयंका व सौरभ केऱ्हाळकर या जोडीला २१-१८, २१-१४ असे पराभूत करीत दुहेरी यश संपादन केले. महिला एकेरीत नेहल गोसावीने, दुहेरी अदिती साधनकर व निकिता जोसेफ आणि मिश्र दुहेरी नबील अहमद व पृथा डेकाटे या जोडीने बाजी मारली. ११ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अविनाश खिराटकर आणि मुलींमध्ये धृती मेहता विजेता ठरली. १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत आदित्य याउल आणि दुहेरीत मयंक राजपूत व झिशान खान विजेते ठरले. १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत रिद्धमा सरपटे, दुहेरीत फिजा अकबानी व ग्रीष्मा कैशलवार, मुलांच्या एकेरीत रुत्व साजवान व दुहेरी अर्जुन खांडेकर व अर्णव पळशीकरने बाजी मारली. १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत क्रिशा सोनी यांनी विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली.
अंतिम निकाल
मिश्र दुहेरी – नबील अहमद व पृथा डेकाटे मात गौरव रेगे व सोफिया सिमॉन (२१-१९,१९-२१,२२-२०)
मुली एकेरी U११ – धरीती मेहता मात शाश्वती देशमुख (२१-१५, २१-९)
मुली दुहेरी U१५ – फिजा अकबानी व ग्रीष्मा कैशाल्वार मात अन्वी वाजगी व धारा भंडारी (२१-७,२१-५)
मुले एकेरी U१५ – ऋत्व सजवान मात स्पर्श कावळे (२१-१८,२३-२१)
मुली एकेरी U१७ – क्रिर्षा सोनी मात रिद्धीमा सरपते ( २१-१८,२१-१०)
मुले एकेरी U१३ – आदित्य याउल मात मयंक राजपूत (२१-१२,२३-२१)
मुली एकेरी U१३ – रिद्धी तिडके मात वैष्णवी मंगळेकर (१४-२१,२३-२१,२१-१७)
मुले एकेरी U११ – अविनाश खिरत्कार मात विहान निमकर (२१-१८,२०-२२,२१-१८)
मुले एकेरी U१७ – अमेय नाकतोडे मात प्रियांशू दुबेय (२१-११,२१-९)
मुले दुहेरी U१५ – अर्जुन खांडेकर व अर्णव पाळशीकर मात आरव ठाकरे व हर्षित नेरकर (२१-९,२१-९)
पुरूष एकेरी – गौरव रेगे मात गंधार नवले (२१-९,१३-२१,२१-१४)
महिला दुहेरी – अदिती साधनकर व निकिता जोसेफ मात क्रिर्षा सोनी व पिनॅक रोकडे
(२१-१७,१६-२१,२१-१६)
महिला एकेरी – नेहाल गोसावी मात अनन्या दुरूगकर (२१-१४,२१-१९)
मुले एकेरी U१३- मयांक राजपूत व झीशन खान मात अर्णव गुप्ता व देवांश ठावकर (२१-१४,२१-१२)
मुली दुहेरी U१३ – रिद्धी तिडके व सान्वी घाटे मात अवनी झडगावकर व सारा पेशकर (२१-७,२१-५)
मुली एकेरी U१५ – रिद्धीमा सरपते मात फिजा अकबानी(२१-१२,२१-१३)
मुले दुहेरी U१७ – अमेया नाकतोडे व प्रणय गाडेवार मात जीवा पिल्लई व स्पर्श कावळे (२१-१५,२१-१४)
मिश्र दुहेरी – गंधार नवले व गौरव रेगे मात मनन गोयंका व सौरभ केऱ्हाळकर (२१-१८,२१-१४)