खासदार श्यामकुमार बर्वे यांनी घेतला कामठी रेल्वेस्टेशन पुनर्विकासीत विकासकामांचा आढावा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी :- अमृत भारत योजनेअंतर्गत कामठी रेल्वे स्टेशन येथे सुरू असलेल्या पुनर्विकासीत कामाच्या ठिकाणी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आज 28 जानेवारी ला सकाळी 11 दरम्यान भेट दिली.यावेळी रेल्वेचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते त्यांच्याकडून खासदार श्यामकुमार बर्वे यांनी होत असलेल्या सर्व कामांचा आढावा घेतला.

यात प्रशस्त आणि आरामदायक प्रतिक्षालय,ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग्यासाठी एस्कीलेटर (सरकते जिणे),उद्यान व भदृश्य,रेल्वे स्टेशन बिल्डिंग चा नवीन आकर्षित स्वरूप,पार्किंग सुविधा,तिकीट घर,नवीन प्रशासकीय रेल्वेची इमारत ,हाय मास्ट लाईट,लिफ्ट,कोंनफोर्स विकास,आकर्षित पोर्च,भुवनेश्वर मॉडेल शौचालय,सीसीटीव्ही कॅमेरा आदी कामांचा आढावा घेण्यात आला.यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नावर उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिलीत तसेच काही कामाबाबत खासदार श्यामकुमार बर्वे यांनी सूचना केल्यात .यावेळी येथील रेल्वे सल्लागार समितीचे पदाधिकारी सह कांग्रेसचे निवडक पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पारधी बेड्यामध्ये दवाखाना आपल्या दारी अंतर्गत आरोग्य तपासणी मोहीम

Tue Jan 28 , 2025
▪️सूमारे 7 हजार पारधी लोकांना तपासणीचे उद्दिष्ट ▪️जिल्हा परिषदेचा पुढाकार  नागपूर :– पारधी समाजातील पात्र असलेला कोणताही लाभधारक शासनाच्या लोककल्याणकारी योजनांपासून वंचित राहता कामा नये या उद्देशाने जिल्हा परिषद व आदिवासी विभागातर्फे जिल्ह्यातील 42 पाड्यांवर “दवाखाना आपल्या दारी” ही मोहीम राबविण्यात आली. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गत आठवड्यात याबाबत निर्देश देऊन विविध शिबीरे घेण्याच्या सूचना केल्या होत्या. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!