– नागरीकांचा सवाल : तक्रार देण्यासाठी जावे लागते नरखेडला
मोवाड :- नरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोवाड पोलीस चौकीला गेल्या अनेक दीवसापासुन पोलीस प्रशासनातील एकही पोलीस कर्मचारी निवासी म्हणुन कर्तव्यावर नाही. त्यामुळे नागरीकांच्या तक्रारींचे निवारण कोण करणार ? असा प्रश्न उपस्थीत झाला आहे. नेहमी बंद राहत असलेल्या येथील पोलीस चौकीला कुणीतरी कायम पोलीस कर्मचारी देता का हो ? असा सुर आता मोवाडसह परीसरातील नागरीकांतुन उमटत आहे. मोवाड हे नगरपरीषदेचे गाव असुन टाऊनशिपमध्ये येत आहे.
महाराष्र्टाच्या सिमारेषेवर हे गाव असुन किमान तिन चार किमी अंतरावर मध्यप्रदेशची हद्द सुरू होते. येथील पोलीस चौकी अंतर्गत खैरगाव, देवळी, बेलोना, पिलापूर, भायवाडी, गंगालडोह, वडाउमरीसह १६ गावे येतात. चौकी नेहमी बंद राहत असुन प्रसंगी आपली तक्रार देण्यासाठी नरखेडला जावे लागत असल्याची नागरीकांची तक्रार आहे. याआधी मोवाड चौकीला निवासी पोलीस कर्मचारी असायचे. आता मात्र अनेक दीवसापासुन पोलीस क्वाॅर्टरला एकही पोलीस निवासी नसल्याने नागरीक आपल्या तक्रारी कुणाकडे देणार असे गावकर्यातुन बोलल्या जात आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोवाड पोलीस चौकीला कायमस्वरूपी निवासी पोलीस कर्मचार्यांची अत्यंत आवश्यकता आहे. तरी पोलीस प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेउन नगरपरीषदेच्या गावातील लोकसंख्येच्या व सलग्न परीसरातील गावांच्या दृष्टीने किमान पाच पोलीस कर्मचारी कायम कर्तव्यावर द्यावे अशी मागणी मोवाडसह अनेक गावातील नागरीकांची आहे.