पर्यटन विभाग आणि भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटना यांच्यात सामंजस्य करार

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल

– मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटनेचे देशातील सर्वात मोठे पर्यटन विषयक अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे 29 सप्टेंबर पासून तीन दिवसांसाठी होत आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाचे पर्यटन संचालनालय भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटना (IATO) यांच्या संयुक्त विद्यमाने एक कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालयातील दालनात पर्यटन विभाग व भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटना यांच्यामध्ये आज सामंजस्य करार झाला. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अध्यक्ष राजीव मेहरा, उपाध्यक्ष रवी गोसाई, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग, नागरी विमान वाहतूक समिती आणि जनसंपर्क समितीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, राज्यात पर्यटनाचा विकास करताना रोजगारांच्या संधीही निर्माण करायच्या आहेत. त्या दृष्टीने पर्यटन क्षेत्रात होत असलेले नावीन्यपूर्ण बदल आणि देशातील पर्यटन क्षेत्रातील सर्व संघटना एकत्र येऊन विचार मंथन होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेता भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटना राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन आयोजित करत आहे. 29 सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या दरम्यान तीन दिवसीय अधिवेशन स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात देशभरातील पर्यटन क्षेत्रातील विविध मान्यवर सहभागी होणार आहेत. तीन दिवसीय अधिवेशनात पर्यटन विषयावर विविध मान्यवर त्यांचे विचार मांडणार आहेत. पर्यटन क्षेत्रातील बदलांचा आणि पर्यटन क्षेत्रात देशाला व राज्याला कशाप्रकारे पुढे नेता येईल यासाठी या अधिवेशनाचा नक्कीच उपयोग होईल, असेही मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा - मंत्री संदिपान भुमरे

Mon Mar 20 , 2023
मुंबई :- ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना ता. पैठण येथील भाग – १ टप्पा-२ कालवा क्र.१, कालवा क्र- २ खेर्डा – पाचोडा उपसा सिंचन योजनासाठी कालवा क्रमांक एक वरील आठ गावांच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाबाबत तसेच कालवा क्रमांक दोन वरील सोलनापूर – राहटगावच्या भूसंपादन मोबदल्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्यात यावा, असे निर्देश रोजगार हमी योजना व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com