संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 4-शेतीसंबंधी महसुलाचे कामकाज योग्य प्रकारे चालावे यासाठी शासनाने तलाठी या प्रशासकोय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून साझानुसार तलाठी कार्यालयाची निर्मिती केली आहे.तलाठी हा महसूल विभागाचा कणा असून कामठी तालुक्यातील चार महसूल मंडळातील 24 साझ्यात 24 तलाठ्या द्वारे 77 गावातील हजारो खातेदारांच्या जमिनींचे दस्तावेज आहेत .मात्र बरेच तलाठी कार्यालय हे भाड्याच्या खोलीत असून शासकीय दस्तावेज असुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.कामठी तालुक्यात एकूण 77 गावांचा समावेश होत असून 47 ग्रामपंचायतीचा समावेश आहे काही ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना सुविधा देण्याच्या दृष्टीने ग्रा प इमारतीच्या बाजूच्याच खोलीत तलाठी कार्यालय ची सोय करून दिली आहे मात्र केम, आडका, गुमथळा, चिकना, भुगाव, वरंभा, म्हसाळा, आवंढी, पावंनगाव, सोनेगाव(राजा)या 10 गावात तलाठी कार्यालय अजूनही 12 हजार रुपये वार्षिक भाड्यातत्वावर सुरू आहेत. मात्र यांना स्वतंत्र कार्यालयच नाही तर या भाड्याच्या इमारतीतून किंबहुना पडक्या खोलीतून हा कारभार चालत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे महत्वाचे दस्तावेज गहाळ किंवा खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तलाठी हा महसूल प्रशासनातील महत्वाचा घटक आहे .शेती महसुलविभाग संबंधित कांमकाजाकरिता ‘तलाठी’या शासकीय कर्मचाऱ्यांची निवड केली आहे .तलाठी हा शासनाने नियुक्त केलेला कर्मचारी असला तरी गाव विकासात त्याची महत्वपूर्ण कामगिरी असते .शेतीसंबंधीत प्रमाणपत्र, सातबारा , नमुना 8 अ, रहिवासी प्रमानपत्र , उत्पन्नाचा दाखला , शेतकऱ्यांना विविध प्रकारचे दाखले देणे, शेतीचे व सिंचन विहिरीचे नोंद करणे, वारसांची नोंद घेणे,ई क्लास जमिनींचे रक्षण करणे, गौण खनिज उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करणे आदी कामे तलाठ्याकडून केली जातात .गावातील महत्वाच्या शास्कोय दस्तावेज तलाठी कार्यालयातून उपलब्ध होत असते तसेच 77 गावाचा कारभार 24 तलाठी सांभाळत असून एका तलाठ्या कडे दोन व त्यापेक्षा अधिकगावाच्या कारभाराची जवाबदारी आहे.मात्र 10 तलाठी कार्यालय हे अजूनही भाड्याच्या इमारतीत असल्याने इमारतीत आवश्यक त्या सोयोसुविधा उपलब्ध करून राहत नाही त्यामुळे शासकीय दस्तावेज असुरक्षित असल्याचे दिसून येते भाड्याच्या इमारतीत कार्यालय असल्याने वेळप्रसंगी कोणतेही हानी झाल्यास दस्तावेज नष्ट होण्याचो शक्यता अधिक असते दिवसेंदिवस कामाचा व्याप वाढत आहे गावे जास्त व तलाठी कमी असल्याने एका एका तालाठ्याकडे अतिरिक्त पदभार दिला आहे. तलाठी कार्यालये हे मोठ्या प्रमाणात शासनाला महसुल मिळवून देत असले तरी कार्यालये भाड्याच्या खोलीत, एका एका तलाठ्याकडे अतिरिक्त पदभार ही स्थिती गेल्या कित्येक वर्षांपासून अजूनही कायम आहे तेव्हा किमान शेतकऱ्यांचे महत्वाचे दस्तावेज सुरक्षित राहावे तसेच दरवर्षी देयक ठरत असलेली भाडे पद्ध्तीला ब्रेक लागावा यासाठी शासनाने तलाठी कार्यालय हे भाड्याच्या खोलीतून हटवून स्वतःच्या शासकीय इमारतीत वा संबंधित ग्रामपंचायत इमारतीत सुव्यवस्था करावी अशी मागणी जोर धरत आहे यावर तहसिलदार अक्षय पोयाम कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
कामठी तालुक्यातील बहुतांश तलाठी कार्यालये अजूनही भाड्याच्याच खोलीत 77 गावाचा कारभार सांभाळतात 24 तलाठी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com