नागपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे विद्यार्थी सेनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष दिनेश इलमे यांच्या उपस्थितीमध्ये तसेच मनसे विद्यार्थी सेनेचे मौदा तालुका अध्यक्ष ॲड. मृणाल तिघरे यांच्या नेतृत्वात विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनसेत पक्ष प्रवेश केला. यावेळी पक्षाचे कार्य, विचार जन सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन उपस्थितांनी केले.
लवकरच पुन्हा भव्य पक्ष प्रवेश व नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन उभारुन अन्याया विरुद्ध लढण्याची ग्वाही मनविसे तालुकाध्यक्ष ॲड. मृणाल तिघरे यांनी दिली. प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजप युवा मोर्चाचे माजी मौदा शहर अध्यक्ष देवेंद्र सानगडीकर, भाजपचे मौदा बूथ प्रमुख योगेश आंबागडे, शिवसेना युवासेनाचे तेली-मांगलीचे शाखा अध्यक्ष आदित्य साठवणे यांचा समावेश होता.
यावेळी मनविसे नागपूर जिल्हा अध्यक्ष दिनेश इलमे, मनविसे मौदा तालुकाध्यक्ष अॅड. मृणाल तिघरे, मनसे मौदा तालुका उपाध्क्ष सुनील वैद्य, आशू गजभिये, सोहेल पठाण, अथर्व गेडेकार, रितिक उरकुडे, यश माकडे, निखिल खुरसनकर, सेवकजी चकोले, धनंजय ओझा, ठोसरे, मिश्रा, गौरव ठोसरे, स्वप्नील चकोले , संदीप चकोले, मयूर भोवते, अभिजित आम्बूलकर, स्वप्निल नानवटकर, रजत कोसरे, प्रशांत मानकर, श्रिकांत रायकोहाड, साहिल बावने, अक्षय सेलोकर, शेखर काटकर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.