नागपूर :-मागील वर्षीपासून संपूर्ण राज्यात लंपी आजाराच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील गुरेबाजार व वाहतूक बंद असल्याने अनेक शेतकरी त्रस्त होते. यामुळे अनेक शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत आले होते.
अनेक शेतकरी या विवंचनेत असताना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांनी पुढाकार घेतला. लंपीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासना तर्फे मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली होती. यामुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यात लंपी चा प्रादुर्भाव कमी झाला आहे.
परंतु हे सगळं झालं असताना सुद्धा शासनाने गुरेबाजार व जनावरांच्या वाहतुकी वरील बंदी काही उठविली नव्हती. याकरिता राज्याचे माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांचेशी बैठक घेऊन चर्चा केली. यानंतर जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत तात्काळ गुरेबाजार व वाहतूक सुरू करण्यासंबंधी आदेश काढले. या मुळे गुरेपालक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आपल्या वक्तव्यात सुनील केदार यांनी सांगितले की, नागपूर जिल्ह्यातील सावनेर, काटोल,मौदा तालुके हे जनावरांच्या बाजारकरिता प्रसिद्ध आहे. परंतु मागील काही काळापासून बंद असलेल्या या व्यवसायामुळे पशुपालक शेतकरी मोठ्या अडचणीत आला होता. त्यामळे जिल्हाधिकारी यांना सर्व परिस्थिती पासून अवगत करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी सुद्धा या विषयातील गंभीरता समजावून घेत व आदेश काढत समस्त पशुपालकाना न्याय दिला आहे.