नागपूर :- मध्य नागपूरचे आमदार प्रविण प्रभाकरराव दटके यांच्या संकल्पनेतून दि.13/04/2025 ,हंसापुरी, खदान मैदान येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत सुदर्शन स्पोर्टिंग क्लब व कुस्ती प्रशिक्षण केंद्रातले कुस्तीगीरांनी उत्कृष्ठ प्रदर्शन करुन आपले व आपल्या प्रशिक्षण केंद्राचे नाव गाजवले.
35 किलो वजनगटात मिलिंद मडावी, रजत पदक 40 किलो वजनगटात वेदांत बोबडे,सुवर्ण पदक समर्पण आंबेकर, रजत पदक 45 किलो वजनगटात पियुष बक्सरे, रजत पदक 50 किलो वजनगटात देव बक्सरे, सुवर्ण पदक विजेता कुस्तीगीरांची या कामगिरीबद्दल सुदर्शन स्पोर्टिंग क्लब व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष क्रिष्ण निसार पटेल, शहर कुस्तीगीर संघ नागपूरचे अध्यक्ष,आमदार संदीप जोशी, उपाध्यक्ष दयाराम भोतमांगे, सचिव पियुष आंबुलकर, कोषाध्यक्ष सतीश वाघमारे एन.आय.एस.प्रशिक्षक संदीप खरे, सहप्रशिक्षक पवन समुंद्रे, शुभम समुंद्रे,सिद्धार्थ खरे आदींनी कुस्तीगीरांना शुभेच्छा दिली.