चिमूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार, आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचा ब्रम्हपुरी तालुक्यातील अऱ्हेर नवरगांव, पिंपळगांव (भो.), हरदोली, चिंचोली, सावलगांव, सोनेगांव, काहाली, खंडाळा व खेडमक्ता येथे प्रचार दौरा 

– आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचे विविध ठिकाणी ग्रामस्थांकडून जंगी स्वागत…

चिमूर :- चिमूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार, जनसामान्यांचे कैवारी, सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व, आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी आज ब्रम्हपुरी तालुक्यातील नान्होरी-अऱ्हेर नवरगांव जिल्हा परिषद क्षेत्रातील अऱ्हेर नवरगांव, पिंपळगांव (भो.), हरदोली, चिंचोली, सावलगांव, सोनेगांव, काहाली, खंडाळा व खेडमक्ता या गावांचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौरा करीत विविध ठिकाणी कॉर्नरसभेत स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला.

स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधताना भाजपा-महायुती सरकारने जनसामान्यांच्या फायद्यासाठी केलेली अनेक लोकोपयोगी विकासकामे व राबविलेल्या अनेक जनकल्याणकारी योजनांची माहिती देत चिमूर विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा-महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून पुन्हा एकदा आपला मतरूपी आशीर्वाद द्यावा. तसेच येत्या २० नोव्हेंबर ला कमळ चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

या प्रचार दौऱ्याप्रसंगी आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी विविध मंदिर देवस्थान व श्री गुरुदेव सेवा मंडळांना भेटी देऊन मनोभावे दर्शन घेतले आणि बौध्द विहार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेटी देऊन विनम्र अभिवादन केले. दरम्यान, समस्त ग्रामवासीयांच्या वतीने विविध ठिकाणी आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचे उस्फूर्तपणे औक्षण करीत स्वागत तथा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लढवय्ये नेते बावनकुळेंच्या पाठीशी ताकदीने उभे राहा! 

Thu Nov 7 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  • वयोवृद्ध नत्थूजी बांडेबुचे यांचे भावनिक आवाहन • कामठीत बावनकुळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कामठी :- चंद्रशेखर बावनकुळे मागील २० वर्षांहून अधिक काळापासून कामठीची सेवा करीत आहेत. मतदारसंघातील विकासाचा ध्यास सतत जोपासणारे, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देणारे लढवय्ये नेते आहेत, यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचे आवाहन कामठीतील ८० वर्षीय समाजकार्यकर्ते नत्थूजी बांडेबुचे यांनी केले. चंद्रशेखर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!