वरूड :- बारी समाजाच्यावतीने राज्यभरातील शिष्ट मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देऊन समाजाला स्वतंत्र विकास महामंडळ द्यावे अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात केली होती. आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दाखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात सदर विकास महामंडळाची घोषणा केली त्यामुळे बारी समाजात उत्साहाचे वातावरण आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांनिबश्री संत शिरोमणी रूपलाल महाराज बारी समाज पानपिंपरी आर्थिक विकास महामंडळ व स्मारक निर्माण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाकडून मंजूर केल्याबद्दल बारी समाजातर्फे आमदार देवेंद्र भुयार यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बारी समाज भवन जरुड येथे शेकडो बारी समाजाच्या नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचा भव्य सत्कार करण्यात आला त्यावेळी अमादर देवेंद्र भुयार यांनी सत्कार समारंभाला उपस्थित राहून केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत आभार मानले. व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या पुढील काळात देखील प्रयत्नशील असल्याचे मत यावेळी व्यक्त करत कायम समाज बांधवांच्या ऋणात राहील असा विश्वास आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी व्यक्त केला.
समाजाच्या विविध मागण्या सह बारी समाजाला स्वतंत्र विकास महामंडळ देण्यात यावे अशी मागणी मागील दोन वर्षांपासून अमादार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे रेटून धरून विधानसभेत लक्षवेधी द्वारे शासनाचे लक्ष वेधून यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे बारी समाजाच्या या विषयाचे महत्त्व व गांभीर्य पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात बारी समाजासाठी राष्ट्रसंत शिरोमणी श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ घोषित केले त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार देवेंद्र भुयार यांचे बारी समाजाने आभार मानले असून राज्यात बारी समाजात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे यावेळी बघायला मिळाले.