कोदामेंढी :- कामठी विधानसभा क्षेत्राचे भाजपा पक्षाचे उमेदवार भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे 13 नोव्हेंबर बुधवार दुपारी तीनच्या दरम्यान खात येथील आयोजित प्रचार सभेत हेलिकॉप्टरने आले.
या विधानसभा क्षेत्रात त्यांची थेट लढत काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्यासोबत होत असून त्यांच्या मुलगा संकेत बावनकुळे व पत्नी ज्योती बावनकुळे हे चार चाकी वाहनाने कामठी विधानसभा अंतर्गत येत असल्या गावागावात भेटी देऊन प्रचार करीत आहेत, असे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावरील त्यांच्या स्टेटस वरून लक्षात येत आहे. तर आमदार बावनकुळे हेलिकॉप्टरने प्रचार करत असल्याने बावनकुळे साठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे.
खात येथील सरपंच माधुरी कैलास वैद्य यांचे पती माजी सरपंच कैलास वैद्य यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह खात येथे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागेची निवड करून परिसर स्वच्छ करून परिश्रम घेतले. या हेलिकॉप्टरने आमदार बावनकुळें सोबत आलेले भाजपचे प्रमुख नेते प्रवीण दरेकर व इतरही भाजपा पदाधिकाऱ्यांचे वैद्य सह खात व परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करून प्रचार सभा यशस्वी केली. खात येथील प्रचार सभेत आमदार बावनकुळे हेलिकॉप्टरने येणार असल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, हे विशेष!