अल्पसंख्याकांसाठी कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आता मिळणार 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज – नवाब मलिक

‘शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय’

           मुंबईदि. 15 : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज घेता येईलअशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

            मंत्री श्री. मलिक म्हणालेमुस्लिमख्रिश्चनजैबौद्धशीखपारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगमनवी दिल्ली यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम  शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत सध्या एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्याकरीता ५ लाख रुपये इतकी कर्ज मर्यादा आहेती वाढवून आता ७ लाख ५० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या भागभांडवलामधून राबविल्या जाणाऱ्या मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेसाठी सध्या असलेली २ लाख ५० हजार रुपयांची कर्जमर्यादा वाढवून आता ती ५ लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. यामुळे एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पुरेसे शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार असून, त्यांचा शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ होणार आहेअसे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

            मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलातही राज्य शासनाने आता 700 कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्ज योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत आहे. यापुढील काळातही महामंडळाच्या विविध योजनांसाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत संपूर्ण प्रोत्साहन देण्यात येईलअसे श्री. मलिक म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भंडारा उपविभागातील महिला शेतकरी पाच दिवसांच्या अभ्यास दौऱ्यावर

Tue Feb 15 , 2022
महिला शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान स्नेही होण्याची गरज –  मिलिंद लाड भंडारा, दि. 15 :  शेती व्यवसायात आधुनिक नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे, या विकसित तंत्रज्ञानाचा वापर शेतीत केल्यास अधिक दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो. शेती व्यवसायात महिला शेतकऱ्यांचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी महिलांनी विविध तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी भंडारा उपविभागीय कृषी कार्यालयातर्फे महिला शेतकऱ्यांसाठी हा पाच दिवसीय (14 ते 18) अभ्यास दौरा आयोजित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com