वाळूघाटासह गौणखनिज उत्खननावर आता ड्रोनद्वारे पाळत

– विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचे कडक कारवाईचे निर्देश

– विशेष बैठकीत घेतला आढावा

नागपूर :- अवैध वाळू व गौण खनिजाच्या उत्खननावर आळा घालण्यासाठी व दोषींवर तत्काळ कठोर कारवाई व्हावी दृष्टीने जिल्ह्यातील वाळूघाट व खदानींवर ड्रोनद्वारे पाळत ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले. वाळूघाट व गौण खनिज संदर्भात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्री. हर्ष पोद्दार, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड आदी उपस्थित होते.

ड्रोनद्वारे प्रत्यक्ष जागेवरचे फुटेज आपल्या हाती लागल्यामुळे गुन्हेगारांवर सप्रमाण गुन्हा सिध्द करण्यासह अशा कारवाईतील पारदर्शकता वाढीस लागेल. याच बरोबर शासनाच्या कारवाई पथकाला सुरक्षित राहून यामार्फत पुरावे गोळा करता येतील. वर्धित सुरक्षितेच्या दृष्टीने प्रगत सेन्सर आणि कॅमेऱ्यांनी सुसज्ज ड्रोनद्वारे वेळीच कारवाई करणे शक्य होईल. मनुष्यबळाच्या सहाय्याने तपासणीसाठी लागणारा वेळ आणि संसाधने ड्रोन तंत्रज्ञानातून मोठ्या क्षेत्राचे गतीने अचूक सर्वेक्षण करू शकतात. यात अचूकता असल्याने संबंधित गुन्हेगारांना वेगळा वचक निर्माण होईल, असे बैठकीत सांगण्यात आले.

जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत 40 वाळूघाट आहेत. या घाटावरुन यापुढे वाळूची तस्करी रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळेल. वाळूघाटासमवेत अवैध खनिज उत्खननाला मोठ्या प्रमाणात आळा घालता येईल, असा विश्वास विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विद्यापीठांमध्ये ‘पर्यावरण संवर्धन’ हा विषय शिकविला जावा - राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केली अपेक्षा

Fri Jan 17 , 2025
– लोकशिक्षण, संशोधन, अंमलबजावणी हीच पर्यावरण संवर्धनाची त्रिसूत्री – आ.मुनगंटीवार – ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज – २०२५’चे उद्घाटन चंद्रपूर :- शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्याची गरज आहे. त्यासाठी पर्यावरण शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल. पर्यावरण संवर्धन किंवा संरक्षण असा विषय प्रत्येक विद्यापीठात शिकविला जावा त्यातून पर्यावरणतज्ज्ञ तयार होतील. पर्यावरण रक्षणाच्या नव्या कल्पना जन्माला येतील. नवे प्रयोग होतील आणि त्यातूनच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!