यशवंतराव चव्हाण राज्य वाङ् मय पुरस्कार विजेत्यांचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले अभिनंदन

मुंबई :- सन 2021 या वर्षातील स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ् मय पुरस्कार विजेत्यांचे मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.

पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या परिक्षण समितीच्या निकालपत्रानुसार 35 विविध वाङ् मय पुरस्कारांसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या 33 लेखक / साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ् मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ् मय पुरस्कार दिले जातात. या अंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ् मय निर्मिती केली आहे, अशा लेखकांकडून विविध वाङ् मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. सन 2021 च्या पुरस्कार स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांच्या अनुषंगाने स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ् मय पुरस्कार 2021 जाहीर करण्यात आले आहेत. 

वाङ् मयाचे प्रकार, पुरस्काराचे नाव, लेखकाचे नाव (पुस्तकाचे नाव), पुरस्काराची रक्कम पुढीलप्रमाणे

प्रौढ वाङ् मय काव्य प्रकारासाठी कवी केशवसुत पुरस्कार : हबीब भंडारे यांना (जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता या पुस्तकासाठी). तर, प्रौढ वाङ् मय – नाटक/एकांकिका प्रकारासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार : नारायण जाधव येळगावकर (यशोधरा), प्रौढ वाङ्मय – कादंबरी प्रकारासाठी हरी नारायण आपटे पुरस्कार : प्रशान्त बागड (नवल), प्रौढ वाङ् मय – लघुकथा प्रकारासाठी दिवाकर कृष्ण पुरस्कार : अनिल साबळे (पिवळा पिवळा पाचोळा), प्रौढ वाङ् मय -ललितगद्य (ललित विज्ञानासह) प्रकारासाठी अनंत काणेकर पुरस्कार : डॉ.नीलिमा गुंडी (आठवा सूर), प्रौढ वाङ् मय – विनोद प्रकारासाठी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार : राजा गायकवाड (गढीवरून), प्रौढ वाङ् मय – चरित्र प्रकारासाठी न.चि.केळकर पुरस्कार : वंदना बोकील-कुलकर्णी (रोहिणी निरंजनी), प्रौढ वाङ् मय – आत्मचरित्र प्रकारासाठी लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार : शरद बाविस्कर (भुरा), प्रौढ वाङ् मय – समीक्षा/ वाङ् मयीन/ संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखनासाठी श्री.के.क्षीरसागर पुरस्कार : दीपा देशमुख यांना (जग बदलणारे ग्रंथ) या पुस्तकासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. हे सर्व पुरस्कार रुपये एक लाख इतक्या रकमेचे आहेत.

तर, प्रौढ वाङ् मय -राज्यशास्त्र /समाजशास्त्र प्रकारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार: सुरेश भटेवरा यांना (शोध..नेहरू-गांधी पर्वाचा!या पुस्तकासाठी ). प्रौढ वाङ् मय – इतिहास प्रकारासाठी शाहू महाराज पुरस्कार : शशिकांत गिरिधर पित्रे (जयतु शिवाजी, जयतु शिवाजी), प्रौढ वाङ् मय – भाषाशास्त्र /व्याकरण प्रकारासाठी नरहर कुरुंदकर पुरस्कार : सदानंद कदम (मराठी भाषेच्या जडणघडणीची कहाणी वाक्प्रचारांची), प्रौढ वाङ् मय – विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) प्रकारासाठी महात्मा जोतीराव फुले पुरस्कार : अरुण गद्रे (उत्क्रांती:एक वैज्ञानिक अंधश्रद्धा? ) , प्रौढ वाङ् मय – शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन प्रकारासाठी वसंतराव नाईक पुरस्कार : सचिन आत्माराम होळकर (शेती शोध आणि बोध), प्रौढ वाङ् मय – उपेक्षितांचे साहित्य प्रकारासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार : सुखदेव थोरात (वंचितांचे वर्तमान), प्रौढ वाङ् मय – तत्वज्ञान व मानसशास्त्र प्रकारासाठी ना.गो.नांदापुरकर पुरस्कार : डॉ.आर.के.अडसूळ (सुखाचे मानसशास्त्र), प्रौढ वाङ् मय -शिक्षणशास्त्र प्रकारासाठी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार : डॉ.साहेबराव भुकण (विनोबा आणि शिक्षण), प्रौढ वाङ् मय – पर्यावरण प्रकारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार :विद्यानंद रानडे (पाण्या तुझा रंग कसा ?), प्रौढ वाङ् मय -संपादित/ आधारित प्रकारासाठी रा.ना.चव्हाण पुरस्कार : संपादक किशोर मेढे (दलित -भारत मधील अग्रलेख). प्रौढ वाङ् मय -अनुवादित प्रकारासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार : अनुवादक अनघा लेले (फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन), प्रौढ वाङ् मय – संकीर्ण प्रकारासाठी भाई माधवराव बागल पुरस्कार : आनंद करंदीकर (वैचारिक घुसळण), सर फोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारासाठी सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार परेश वासुदेव प्रभू यांना गोपालकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य या पुस्तकासाठी जाहीर करण्यात आला आहे. हे सर्व पुरस्कार रुपये एक लाख इतक्या रकमेचे आहेत.

बाल वाङ् मय – कविता प्रकारासाठी बाल कवी पुरस्कार : विवेक उगलमुगले (ओन्ली फॉर चिल्ड्रन या पुस्तकासाठी), बाल वाङ् मय – नाटक व एकांकिका प्रकारासाठी भा.रा.भागवत पुरस्कार : डॉ.सोमनाथ मुटकुळे (खेळ मांडियेला)., बाल वाङ् मय – कादंबरी प्रकारासाठी साने गुरुजी पुरस्कार सौ.वृषाली पाटील (पक्षी गेले कुठे? ), बाल वाङ् मय – कथा प्रकारासाठी राजा मंगळवेढेकर पुरस्कार : सुहासिनी देशपांडे (किमयागार), बाल वाङ् मय सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे प्रकारासाठी) यदुनाथ थत्ते पुरस्कार प्राध्यापक सुधाकर चव्हाण यांना चला शिकू या वारली चित्रकला या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. बाल वाङ् मय संकीर्ण प्रकारासाठी ना.धो.ताम्हणकर पुरस्कार प्राध्यापक विद्या सुर्वे यांना कोरा कागद निळी शाई या पुस्तकासाठी, प्रथम प्रकाशन- काव्य प्रकारासाठी बहिणाबाई चौधरी पुरस्कार : रमजान मुल्ला (अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टान्त), प्रथम प्रकाशन- कादंबरी प्रकारासाठी श्री.ना.पेंडसे पुरस्कार : स्वेता सीमा विनोद (आपल्याला काय त्याचं) प्रथम प्रकाशन- लघुकथा प्रकारासाठी ग.ल.ठोकळ पुरस्कार : विश्वास जयदेव ठाकूर (नात्यांचे सर्व्हिसिंग), प्रथम प्रकाशन- ललितगद्य प्रकारासाठी ताराबाई शिंदे पुरस्कार: वीणा सामंत (साठा उत्तराची कहाणी), प्रथम प्रकाशन- समीक्षा सौंदर्यशास्त्र प्रकारासाठी रा.भा.पाटणकर पुरस्कार : प्रा.डॉ.प्रकाश शेवाळे (अनुष्टुभ नियतकालिकाचे वाङ्मयीन योगदान) या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. या सर्व पुरस्काराची रक्कम 50 हजार रूपये इतकी आहे.

तर, प्रौढ प्रकाशन- नाटक/एकांकिका प्रकारासाठी विजय तेंडुलकर पुरस्कार आणि प्रौढ वाङ् मय – अर्थशास्त्र व अर्थशास्त्र विषयक लेखनासाठी सी.डी.देशमुख पुरस्कारासाठी शिफारशी प्राप्त नाहीत.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पत्रकारांनी शाश्वत जीवनमूल्ये जोपासावी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी : वृत्तांकनात निर्भिडता असावी

Fri Dec 9 , 2022
मुंबई :- व्यवसाय, खेळ यांसह इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच आज माध्यम विश्वात तीव्र स्पर्धा सुरु झाली आहे. त्यामुळे बातम्या सनसनीखेज व भावनिक बनविण्याकडे कल वाढत आहे. वृत्तांकन करताना खरेपणा असावा, निर्भीडता असावी, राष्ट्रभाव असावा. परंतु खोडसाळपणा नसावा, असे सांगताना पत्रकारांनी मूल्याधिष्ठित पत्रकारिता करावी तसेच शाश्वत जीवनमूल्ये जोपासावी, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. ‘व्हॉइस ऑफ मिडिया’ या प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या देशव्यापी संघटनेच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!