– सेंट्रल एव्हेन्यू मार्गिकेचे करणार निरीक्षण
नागपूर :- मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त (सीआरएमएस) श्री जनक कुमार गर्ग आणि इतर अधिकारी उद्यापासून (फेब्रुवारी १८) ३ दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत. आपल्या या दौऱ्यात अधिकाऱ्यांचे हे पथक रिच ४ ( सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर) मेट्रो स्टेशनची प्रामुख्याने पाहणी करतील. सीआरएमएस चे पथक १८ फेब्रुवारीला नागपुरात दाखल होईल आणि महामेट्रो नागपूर अधिकाऱ्यांशी चर्चा करतील तसेच विविध सादरीकरण बघतील. दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त आणि त्यांच्या पथकातील इतर अधिकारी या मार्गिकेवरील स्टेशनची पाहणी करतील. त्यानंतर ते रोलिंग स्टॉक, ओएचई, ट्रॅक इत्यादीचे निरीक्षण करतील. श्री. गर्ग आणि इतर अधिकारी रिच ४ मध्ये ट्रेनची अद्यावत सॉफ्टवेयर तपासतील
मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त यांच्या पथकातील इतर अधिकारी या प्रमाणे आहेत – श्री. रिषभ द्विवेदी आणि श्री. चंदन कुमार श्री. गर्ग यांच्या सोबत हे अधिकारी नागपूर दौऱ्यात असतील.
सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.३० किमीच्या या मार्गावर एकूण ०९ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे ज्यामध्ये कॉटन मार्केट,नागपूर रेल्वे स्टेशन,दोसर वैश्य चौक,अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलीफोन एव्सचेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक,प्रजापती नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. नागपूरच्या पूर्व आणि पश्चिम नागपूर भागांना सेंट्रल एव्हेन्यू हा एक प्रमुख मार्ग आहे.
या मेट्रो मार्गिकेला लागून गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ इत्यादी असे प्रमुख व्यापारिक क्षेत्र आहे. वाहतुकीची सुविधा या क्षेत्राकरता महत्वाची असून, मेट्रो रेल सेवेच्या माध्यमाने निश्चितच हे पूर्ण होणार आहे. नागपूरचा सेन्ट्रल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन येथून होते.नागपूर शहराचा विस्तार होत असतांना या मार्गवरील वाहतूक देखील सातत्याने वाढली. बाजारपेठ वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबवतांना मेट्रोने पुरेपूर काळजी घेतली. या मार्गीकेवरील प्रवासी सेवा सुरु झाल्यावर मेयो हॉस्पिटल,रेल्वे स्थानक,कॉटन मार्केट,इतवारी बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाणे सोईस्कार ठरेल.