संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- तालुक्यातील आजनी गावातील सावित्रीबाई ज्योतीराव फुले निःशुल्क अभ्यासिका आणि वाचनालयाचा पंधरावा वर्धापन दिवस शनिवार दिनांक ०२ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
ज्येष्ठ गजलकार ज्ञानेश्वर वांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात उमेश मस्के, सरपंच संजय जीवतोडे, उपसरपंच हेमराज दवंडे, गजानन घोडे, माला इंगोले, नामदेव भगत, शिवबा राजे फाउंडेशनचे कार्यकर्ते, पोलीस पाटील बळवंतराव रडके, घनश्याम चकोले, करुणा रडके, राहुल शेळके, विनोद वाट, सुधाकर विघे, निखिल विघे, गणपत झलके, दिवाकर घोडे, तुकाराम लायबर, पराग सपाटे, गजेंद्र वाट, गुणवंत पाटील, मनोहर हेटे, अमोल लोहकरे, प्रमोद भोयर, राजु गौतम, जीवन वीघे, आशिष रडके, शेषराव चौके, पल्लवी नांदुरकर, ऋतुजा गिऱ्हे, वंदना चकोले, कुंदा ठाकरे, प्रफुल्ल घोडे, पृथ्वीराज डोंगरे, अनिकेत इंगोले, अविनाश मेश्राम, ललित ढोक, कृष्णा घोडे, सचिन ढोले, गजानन दवंडे, प्रियांका विघे, स्मिता देवसरकर, प्रतिभा दवंडे, माधुरी वाट, दयावंती उकेबोंदरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सावित्रीबाई फुले आणि शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सुरु झालेल्या या कार्यक्रमात गावातील पोलीस खात्यात लागलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार, वाचनालयासाठी सहकार्य करणाऱ्या दात्यांचा सत्कार, एअर होस्टेस, रेल्वेतील कर्मचारी, दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट वाचक आदींचा सन्मानचिन्ह आणि शॉल देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच सुधाकर विघे, उमेश मस्के, निकिता वानखेडे, निलेश मरस्कोल्हे, राहुल गिऱ्हे यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना व वाचनालयाला आर्थिक मदत देण्यात आली.
सूत्र संचालन वाचनालयाचे संचालक लीलाधर दवंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुहानी फुकट हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवयुवक युवा मंडळाचे कार्यकर्ते, वीर बजरंग क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते, जय बजरंग क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते, रेणूका क्रीडा मंडळाच्या खेळाडू, सावित्रीबाई फुले अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.