– पुरुष आयोग झालाच पाहिजे – अध्यक्ष आनंद बागडे
नागपूर :- सेव इंडियन फॅमिली (SIF) च्या अंतर्गत जेंडर इक्वॉलिटी ऑर्गनायझेशन च्यावतीने पूर्ण भारतभर 12 एप्रिल रोजी पूर्ण संघटेने द्वारा नागपुरातील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून १२ एप्रील या दिवशी, प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. कारण येत्या 19 एप्रिल रोजी जंतर मंतर दिल्ली येथे सकाळी ९ वाजता. पुरुषांसाठी सत्याग्रह आंदोलन करणार असल्याची माहिती अध्यक्ष आनंद बागडे यांनी पत्रकारांना दिली. पुरुषांसाठी पुरुष आयोग झालाच पाहिजे ? अशी त्यांची मागणी आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कानून कायदे सरकारने केलेले आहे. महिला त्याचा दूरुपयोग करतात आणि पुरुषांना खोट्या केसेसमध्ये फसवणूक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करतात म्हणून त्यांचे परिवार त्यांच्यापासून दूर गेलेले आहे. नातेवाईक तुटलेली आहे आणि बरेचसे लोक असे आत्महत्या करत आहे. त्यासाठी पुरुष आयोग झालाच पाहिजे अशी मागणी परिषदेतील संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली. पुरुषावर अन्याय होणे ही चिंतेची बाब आहे. कारण पुरुषांवर अन्याय झाला तर त्याला न्याय कोण देईल हा प्रश्न निर्माण होतो ? स्त्री एक माता आहे. ती बहीण आहे. ती आपली पत्नी आहे. आणि तिला आपल्या भारत सरकारने सर्वच गोष्टींमध्ये प्राधान्य दिलेले आहे. स्त्रीला लवकरच न्याय मिळते. आज पर्यंत स्त्रीची च हुकूमशादी नवऱ्यावर हक्क गाजवते अशा प्रकारचे कानून कायदे तयार झालेले आहे. एक स्त्री आपल्याच पतीवर केस टाकत असेल किंवा कोणत्याही गोष्टींत त्याची फसवणूक करत असेल किंवा घरापासून व आपल्याच नातेवाईका पासून लांब ठेवत असेल तर त्या माणसावर काय परिणाम होईल याच काहीच सांगता येत नाही म्हणून मनुष्याला आत्महत्या करण्यास भाग पाडते. म्हणूनच पुरुषांनी ४० NGO तयार करून सेव इंडियन फॅमिली अंतर्गत जेंडर इक्वालिटी ऑर्गनायझेशन तयार करून पुर्ण भारतभर जनजागृती करून प्रत्येक पुरुषाला न्याय मिळालाच पाहिजे तसेच चार प्रकारे मागण्या केलेल्या आहेत.
राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी:
कायद्यांचा गैरवापर आणि खोटे खटले रोखणे:
वाढत्या पुरुष आत्महत्या थांबवण्यासाठी आवश्यक पावले:
केंद्र सरकार ने तटस्थ कायदे लागू केले पाहिजेत: अशाप्रकारे परिषदेत माहिती दिली. आणि ज्या पुरुषांवरील अन्याय, अत्याचार, कुटुंबाकडून मानसिक त्रास झालेला आहे. घरदार तुटलेले आहे. आपल्या कुटूंबापासून वंचित आहे. घरच्या स्त्रि ने परिवाराला दूर केलेले आहे. असे व्यक्ती यावेळी परिषदेला हजर होते. याप्रसंगी राज्यभरातून आलेले पुरुष उपस्थित होते. पत्रपरिषदेला उपस्थित अध्यक्ष आनंद बागडे, निशांत कांबळे, चंचल पटले व संचालक अमोक नगरारे यांची उपस्थिती होती.