विषारी औषध प्राशन करून इसमाची आत्महत्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 25 :- कामठी रोड वरील कपिलांश कंपनीत मजूर पदी कार्यरत असलेल्या कन्हान टेकाडी रहिवासी इसमाने आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणावरून विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना गतरात्री साडे दहा दरम्यान घडली असुन मृतक इसमाचे नाव चक्रधर रामकृष्ण बोबडे वय 50 वर्षे रा टेकाडी कन्हान असे आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक इसम हा रात्री आपल्या घरी असतेवेळी घरात लपवुन ठेवलेले सेल्फओस नावाचे विषारी औषध प्राशन केले.घरमंडळींना सदर घटनेची कुणकुण लागताच मृतक इसमाच्या मुलाने तात्काळ कामठी च्या माहुरे हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ हलविले दरम्यान सदर इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला.आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही.घटनेची माहीती मिळताच जुनी कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यासंदर्भात पोलिसानी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विशेष कार्यक्रमाचे उत्साहात सादरीकरण.

Mon Jul 25 , 2022
मुंबई : मराठी साहित्य विश्वातील एक अलौकिक साहित्य प्रतिभा लाभलेल्या कवियित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने “हे शब्द रेशमाचे” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे दि. २३ जुलै, २०२२ रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांच्या उस्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन विलेपार्ले मतदार संघाचे आमदार पराग अळवणी यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीधर फडके, पुष्कर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com