आठवणी: WHC DHARAMPETH Road (DP Road) आणि भारताचा क्रिकेट विजयाचा जल्लोष 

नागपूर :- आज भारतीय क्रिकेट टीम ने पाकिस्तान टीम चा धुव्वा उडविला आणि पुन्हा एकदा नागपूरच्या आसमंतात भारत माता कि जय चा नारा निनादला. नागपूरकर तरुणाई ने अनेक वर्षांपासूनची आपली परंपरा कायम राखत शंकर नगर ते धरमपेठ (गोकुळपेठ किंवा लक्ष्मी भुवन चौक ) येथे ह्या विराट विजयाचा फटाक्याच्या आतिषबाजीत “विराट” कोहली जल्लोष केला …

परंतु शंकर नगर ते धरमपेठ (गोकुळपेठ किंवा लक्ष्मी भुवन चौक ) ज्याला आमच्या कॉलेज जीवनात डीपी रोड (DP Road) म्हणायचे ह्या मार्गावर हि परंपरा – तरुणाई चे जमणे आणि जल्लोष करणे -नक्की सुरु झाली कधी ? हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे…

१९९० च्या दशकात डीपी रोड (DP Road) हा नावाजलेला रोड होता. वॉल्क -इन रेस्टॉरंट , दुर्गा रेसटॉरेन्ट म्हणजे कॉलेज तरुणाईचा (तरुण-तरुणी) अड्डाच. तिकडे पूनम चेम्बर्स नंतर प्रचलित झाले .१९९० च्या दशकात आणि नंतर देखील दररोज संध्याकाळी ह्या रोड नि एक तरी चक्कर मारणे कम्पलसरी होते. वार्षिक ३१ डिसेंबर च्या रात्री ह्या रोडवरून चक्कर नाही मारली तर पाप लागायचे …चक्कर मारणे आणि व वॉल्क -इन रेस्टॉरंट ((चौक) येथे रात्री १२ वाजता जल्लोष करणे …आणि त्यानंतर पोलिसांचा होणार लाठीचार्जे हे समीकरण ठरलेले असायचे. एक वर्षी मला हि माझ्या “तशरीफ” वर पोलिसांच्या ह्या दांड्याचा प्रसाद मिळाला आहे ….त्यानंतरचा एक महिना कसा गेला आजिबात विचारू नकाच ….समजून जा …काय हाल झाले असतील …असो .

आजचा विषय आहे भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच आणि लक्ष्मी भुवन चौकात होणारा नागपूरच्या तरुणाईचा जल्लोष. मला आठवतंय ते वर्ष १९९६, मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असेल तेव्हा भारत -पाकिस्तान वर्ल्ड कप लढत बंगलोर ला सुरु होती. त्या सामन्यात आपल्याला आठवत असेल आमीर सोहेल ने वेंकटेश प्रसाद ला चौकार हाणला आणि त्याचा वचपा अगदी दुसऱ्याच चेंडूवर वेंकटेश प्रसाद ने आमिर सोहेल ला त्रिफळाचित (क्लीन बोल्ड) करून काढला. त्या सामन्याआधी सर्वांचे हेच म्हणणे होते आम्हाला वर्ल्ड कप नको हा सामना द्या.

कदाचित १९८६ च्या भारत -पाकिस्तान च्या शारजाह कप अंतिम सामन्यात जावेद मियांदाद ने चेतन शर्मा ला मारलेल्या अंतिम बॉल वरील सिक्स चा तोच नागपुरी भाषेत फिट्टम फाट क्षण होता. १९८६ -ते १९९६ नंतर मला देखील आठवत नाही कि असा जल्लोष डीपी रोड (DP Road) ला कधी झाला असेल …(असल्यास वाचक ऍड करू शकतात)

१९९६ चा वर्ल्ड कप बंगलोर सामना जिंकल्यावर सर्वानी एकच जल्लोष केला आणि आम्ही सर्व मित्र रात्री चलो “डीपी रोड (DP Road)” म्हणून निघालो. त्या काळात मोबाईल नव्हते फक्त लँडलाईन फोन चा जमाना होता. कोणी कोणाला फोन केले नाही, सर्व स्वयंस्फूर्तीने हजारो च्या संख्येने संपूर्ण डीपी रोड (DP Road)” वर जमा झालो . फक्त आम्हीच नाही ..नागपुरातल्या विविध भागातील शेकडो तरुण-तरुणी वॉल्क -इन रेस्टॉरंट (चौक) चौकात जमा झाले आणि मोठा जल्लोष करण्यात आला. सगळीकडे भारतीय तिरंगा दिसत होता. कोणीतरी बहाद्दराने आपल्या ओपन जीप वर डेक (त्याकाळी फार फेमस ) आणि स्पीकर लावून आणले आणि आबालवृद्ध पासून सर्व क्रिकेट प्रेमींनी भारतीय विजय साजरा केला .

त्याआधी असा विजय नागपुरात कुठे साजरा झाला का मला माहित नाही , पण त्यानंतर भारत-पाकिस्तान सामना कुठेही असो…त्यावर जर भारताचा विजय झाला तर वॉल्क -इन रेस्टॉरंट (चौक) येथे विजयी जलोष हा ठरलेलाच असे. मीडिया सुद्धा त्यानंतर अश्या विजयानंतर सरळ ह्या चौकात पोहोचत असते दुसऱ्या दिवशी च्या अंकासाठी सुपर फोटो साठी. हि नागपुरातील आता एक परंपराच झालेली आहे …फक्त नवीन तरुणाई आता मैदानात आहे आणि स्पॉट वॉल्क -इन रेस्टॉरंट (चौक) वरून लक्ष्मी भुवन चौक झाला आहे.

मला आठवतंय ..जेव्हा भारत-पाकिस्तान २०-२० चा फायनल सामना भारताने जिंकला तेव्हा मी टाइम्स ऑफ इंडिया ला पत्रकार होतो …तेव्हा सर्वांचा एकच आवाज होता –चलो लक्ष्मी भुवन.. आता नुकतिच झालेली T20 & India champion …..म्हणजे परंपरा सुरु आहे …. शुरूच राहिल ….जय हो…

सचिन …..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे - एकनाथ शिंदे

Mon Feb 24 , 2025
– राजधानीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा भावपूर्ण समारोप – दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येणार – अजित पवार – संस्कृतीची वाहक असलेल्या भाषेची निगा राखणे सर्वांचे कर्तव्य – डॉ. भवाळकर नवी दिल्ली :- भाषा ही आपली ओळख, अस्मिता, आणि अभिमान असून भाषा हेच आपले अस्तित्व आहे. भाषा संपली तर आपले अस्तित्वही संपेल हे लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी सर्वांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!