संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 05 :- महिला दक्षता समिती ही पोलीस स्टेशन मध्ये महिला सेलच्या माध्यमातून आलेल्या तक्रारी समुपदेशनाच्या माध्यमातून सोडविणे तसेच एखादी तक्रारदार पीडित महिला झालेल्या अत्याचार विरोधात पोलिस स्टेशनला गेली असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली असता पुढाकारातून तक्रार नोंदविण्याचे काम करीत असते यानुसार नवीन कामठी पोलीस स्टेशनला महिला पोलिस उपनिरीक्षक गीता रासकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला दक्षता समितीची बैठक घेण्यात आली.या बैठकीची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादन वाहण्यात आले.
या बैठकीत महिलावर होणारे अन्याय अत्याचार , शहरातील संवेदनशील भाग, कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी ऊपाययोजना आदी संदर्भात प्रतिकारात्मक प्रतिक्रिया व त्यावरील कायदेशीर मार्गदर्शन करन्यात आले तसेच कायदा व सुव्यवस्था नियंत्रण ठेवण्याहेतु विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी महिला दक्षता समितीत विद्या भीमटे, सुधा रंगारी, ऍड भीमा गेडाम, ऍड रिना गणवीर,ऍड जिजाबाई वाहणे, वंदना पुरोहित, राणू कांबळे, शिला मेश्राम, वर्षा पाटील, निशा रामटेके, पिंकी थोरात, रेखा पाटील, वृंदा मानकर, विशाखा गजभिये, माधुरी उके, आदी उपस्थित होते.