नागपूर :- मध्यस्ती हा वैकल्पिक वाद निवारणाचा प्रकार असून, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा होण्याची प्रक्रिया उपयुक्त आहे असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश सचिन पाटील यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरचे मध्यस्थी जागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात एक मुठ्ठी आसमान’ या नालसा गीताद्वारे आणि रोपट्यांना जलार्पण करून करण्यात आली. नागपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या न्यायाधीश सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मध्यस्थ प्रशिक्षक राजेंद्र राठी आणि प्रशिक्षित मध्यस्थी अधिवक्ता अँड. सुरेखा बोरकुटे आणि अँड. एस. आर. चरलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्यायाधीश सचिन पाटील यांनी असे प्रतिपादन केले की, दिवाणी प्रकीया संहीताचे कलय ८९ मध्ये प्रावधानित मध्यस्थी प्रकिया गोपनीय, एैच्छिक, पारदर्शक, लवचिक व कमी खर्चिक असून न्यायालयातील प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणे मध्यस्थी प्रक्रियेद्वारे निकाली काढता येतात. या प्रक्रीयेद्वारे प्रकरणे निकाली निघाल्यास दोन्ही पक्षांना मैत्रीपूर्ण वातावरण व अधिक समाधान देणारा त्वरीत न्याय मिळतो व त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध कायम राहतात. आणि पैसा, वेळ, आणि श्रम यांची बचत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्हा न्यायालय नागपूर व तालुका न्यायालयामध्ये मध्यस्थी केंद्र कार्यरत असून तेथे दाखलपूर्व आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे प्रशिक्षित न्यायिक अधिकारी व अधिवक्ता यांच्या मध्यस्थीने सामोपचाराने निकाली काढण्यात येत असून पक्षकारांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन न्यायाधीश श्री सचिन पाटील यानी केले.
सन २०२१ पासून आजपर्यंत २१३६ प्रलंबित प्रकरणे निकाली :- सन २०२१ पासून नागपूर जिल्हयातील न्यायालयांनी मध्यस्थी प्रक्रियेसाठी संदर्भित केलेले १९५२ प्रकरणे आणि वादपूर्ण १८४ प्रकरणे अशी ऐकून २१३६ प्रकरणे मध्यस्थी प्रक्रियेच्या माध्यमातून समोपचाराने मिटल्याची माहीती न्या.सचिन पाटील यांनी दिली.
मध्यस्थी अधिनियम २०२३ आणि मध्यस्थी प्रक्रियेसाठी कोणती प्रकरणे ठेवता येतात याबाबत राजेंद्र राठी यांनी मार्गदर्शन केले. अँड. बोरकुटे यांनी मध्यस्थी प्रक्रियेची गरज, फायदे, समान न्याय तत्वाबाबत माहिती दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर येथील विधी सस्वयंसेवक डॉ. आनंद मांजरखेडे यांनी सुत्रसंचालन केले मध्यस्थी अधिवक्ता एस. आर चारलवार यांनी मध्यस्थी प्रक्रिये बाबतचे त्यांचे अनुभव सांगितले. तसेच अमर गुरबानी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमात पक्षकार, मध्यस्थी अधिवक्ता, पॅनल अधिवक्ता, अनेक विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विधी स्वयंसेवक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.