– शहीद स्मारक लोकार्पण – शहीदांना आदरांजली अर्पण.
नागपूर :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत बलिदान देणारे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व इतर ज्ञात-अज्ञात शहीदांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने प्रभाग 17 च्या माजी नगरसेविका हर्षला मनोज साबळे व समस्त स्थानिक नागपूर नागरिकांच्या वतीने शहीद स्मारकाचे लोकार्पण करण्यात येत आहे.
या स्मारकाच्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट करताना “शहीदांचे बलिदान अजरामर ठेवण्यासाठी आणि युवा पिढीला प्रेरणा देण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आले” असा विश्वास हर्षला मनोज साबळे यांनी व्यक्त केला आहे. तसेच शहीदांच्या त्यागाचे स्मरण करून, नव्या पिढीने देशभक्ती आणि राष्ट्रसेवा यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उपस्थित नागरिकांनी केले.
या ऐतिहासिक क्षणी गणेश तेलरांधे, सुरज बांते, राजेश कुंभलकर, उमेश सूर्यवंशी, लालसिंग यादव, मिलिंद येवले, लेकूरवाळे गुरुजी, नितीन खरे, विजय कांबळे, गुड्डू (अमर) जोशी, चिकू धांडे, आशिष वैद्य, प्रितीश गंगशेट्टीवार, विपुल लोखंडे, अश्विन गणवीर, हर्ष मते, हर्षल काटवे, संदेश उके, हेमंत शाहू, कुंदा श्यामकुवर, प्रणय श्रीखंडे, वैभव शिंदे पाटील, अक्षय लक्षणे सोबत स्थानिक नागरिक आणि एक वादळ भारताचं चळवळीतील युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये : शहीद स्मारकाचे लोकार्पण व पुष्पार्पण “शहीदांचे बलिदान विसरू नका, त्यांच्या त्यागातूनच राष्ट्र उभे आहे!”