मातृशक्ती वृद्धाश्रमाचे गडकरीच्या हस्ते उदघाटन संपन्न

-हा वृद्धाश्रम म्हणजे गोरगरीबांसाठी आनंदाश्रम – नितीन गडकरीचे गौरवोदगार
नागपूर –  श्री गजानन महाराज श्रद्धास्थान रेशीमबाग येथील श्री संतकवी कमलासुत कल्याणकारी संस्था, द्वारा निर्मित  उमरेड रोड, कळमना,टाकळी येथे नुकतेच भारत सरकारचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री मा. श्री नितीनजी गडकरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई गडकरी यांच्या शुभहस्ते स्व वंदनाताई वराडपांडे स्मृती मातृशक्ती वृद्धाश्रमाचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. या वृद्धाश्रमाची संकल्पना गजानन महाराज श्रद्धास्थान रेशीमबाग चे संयोजक श्री गिरीश चंद्रशेखर वराडपांडे यांची असून या वृद्धाश्रमातील वृद्धाना आरोग्यसेवा डॉ श्रीरंग वराडपांडे व त्यांच्या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून देण्यात येईल. वृद्धाश्रमाच्या निर्मितीत श्रद्धास्थानातील भाविकावृंदांनी विशेष रूपाने सहकार्य केलं. या संस्थेचे संस्थापक गुरुवर्य वै. संतकवी कमलासुत यांच्या प्रेरणेने समाजातील ज्येष्ठ, गरजू , निराधारांना आपले आयुष्य सन्मानाने, सुदृढ आरोग्याने जगता यावं तसंच विविध धार्मिक, सामाजिक आयोजित  उपक्रमामुळे  त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ रमणीय व्हावी हा या वृद्धाश्रमाच्या निर्मितीचा सद्हेतू आहे.
या उदघाटन प्रसंगी मा. नितीनजी गडकरी यांनी श्रद्धास्थानाच्या या उपक्रमाचे कौतुक करून हा वृद्धाश्रम गोरगरिबांसाठी आनंदाश्रम ठरेल, तसंच कमलासुत चंद्रशेखर वराडपांडे हे सत्पूरुष असून त्यांनी जीवनभर समाजप्रबोधनाचं अविरत कार्य केलं आणि त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र गिरीश हे  लोकसंग्रहातून पुढे चालवत आहे, त्यांना जे सहकार्य लागेल ते आपण करू असं आश्वासन देऊन मातृशक्ती वृद्धाश्रमाला 5 लाख रुपयांची देणगी दिली.
      शहरापासून हा वृद्धाश्रम 11 किमी अंतरावर असून निसर्गरम्य हवेशीर परिसरात वै. वं. संतकवी कमलासुतांच्या पुण्यपावन स्मृतीस्थळी जागृत शिवहनुमान मंदिर, आध्यात्मिक उपासना केंद्र, दैनंदिन आरोग्यासाठी तज्ञ सेवाभावी डॉक्टर्स द्वारे आरोग्य तपासणी, औषधीपचार, उत्कृष्ट शाकाहारी भोजन, स्वच्छतागृह, उद्यान, वाचनालय, योगा केंद्र, भजन, प्रवचन ,व्याख्याने, आदी व्यवस्थ्यांचे नियोजन करणारा संचालक व कर्मचारी वर्ग अशा सर्व आवश्यक सोयीनी युक्त हा वृद्धाश्रम असून यासाठी श्री प्रकाश निमजे, डॉ मुकुंद पांडे,सुभाष मानकर, नरेंद्र गोरले, दादाराव गकरे, सुबोध चिंच्मालातपुरे,ममता मानकर, चित्रा मानकर, चंदा भोयर, भारती वाळके,माधुरी देऊस्कर, आदींनी विशेष सहकार्य केले. या वृद्धाश्रमाच्या अधिकृत नोंदणीसाठी नागरिकांनी संस्थेचे अध्यक्ष – श्री गिरीश वराडपांडे 9823719801, सचिव – डॉ श्रीरंग वराडपांडे 9766573802, श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान, रेशीमबाग येथे संपर्क साधावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी - मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Thu Feb 3 , 2022
मुंबई, दि. 3 : जिया राय दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमिंग आणि ओपन वॉटर स्विमिंगमध्ये जागतिक विक्रम  केला आहे. बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी असल्याचे मत, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती  ठाकूर यांनी व्यक्त केले.            क्रीडा श्रेणीमध्ये ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने सन्मानित जिया राय हिचा सत्कार महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com