दुबई (अबुधाबी) येथील ‘वामच्या’ जागतिक अधिवेशनात “माता कन्यका-वासवी-भक्तीरसामृत” पुस्तिकेचे विमोचन संपन्न

यवतमाळ :- आर्य वैश्य महासभा (वाम) चे जागतिक अधिवेशन नुकतेच दुबई-अबुधाबी येथे संपन्न झाले आर्य वैश्य समाजाची आराध्य देवता जगदंबा-पार्वतीचा अवतार असलेल्या “माता वासवी कन्यका परमेश्वरी चे” आदर्श चरित्र, प्रखर राष्ट्रभक्ती व मानव जातीच्या उत्थानासाठी मातेने दिलेला तेजस्वी संदेश फारच कमी लोकांना माहीत आहे. संपूर्ण जगभर पसरलेल्या संपन्न अशा आर्य वैश्य समाजाच्या आराध्य देवतेबद्दलच्या साहित्याची असलेली उणीव अत्यल्प प्रमाणात भरुन काढण्याचा प्रयत्न आर्य वैश्य समाज यवतमाळ व्दारा प्रकाशीत आणि साधना बंडेवार व्दारा लिखीत “माता कन्यका-वासवी- भक्तीरसामृत” या पुस्तिकेने केलेला आहे. सदर पुस्तिकेमध्ये भक्तीगीते, स्तवन, आरत्यांच्या माध्यमातून कन्यका मातेचा तेजस्वी संदेश प्रसृत करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सदर पुस्तिकेचे विमोचन नुकतेच अबुधाबी येथील ‘वाम’ च्या जागतिक अधिवेशनात वामचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार डी.जी. व्यंकटेश, चेन्नई, वामचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रामकृष्ण संगुतुरी, वामच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष सरलारानी गुरु चेन्नई, श्रीलता उपेंद्र ह्यांचे शुभहस्ते वामचे महाराष्ट्र अध्यक्ष किशोर नालमवार, सचीव  गजानन बेलगमवार आणि वामचे अन्य ज्येष्ठ राष्ट्रीय पदाधिकारी आणि सदस्यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. ह्या कार्यक्रमास जगभरातील विविध देशांचे ‘वाम’ सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ह्या पुस्तिकेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य हे की, यातील सर्व गीते ही प्रचलीत विविध गीतांच्या कराओके ह्या नवीन तंत्राधिष्ठीत संकल्पनेनुसार संगीताचे मीटर सांभाळून लिहीलेली असल्याने कोणत्याही गायकाला ती कराओकेवर सहज गाता येण्यासारखी आहेत. विशेष म्हणजे ह्या सर्व गीतांचे ध्वनीमुद्रण करुन ती युट्युबवर टाकण्याचे काम यवतमाळचे आमदार मदन  येरावार ह्यांचे प्रोत्साहन, सहकार्य व मार्गदर्शनाखाली आर्य वैश्य समाजाचे उदयोन्मुख गायक कलावंत करीत आहेत. सदर पुस्तिकेच्या प्रकाशनासाठी आर्य वैश्य समाज यवतमाळचे विद्यमान अध्यक्ष विजय पालतेवार व समस्त संचालक मंडळ आणि टंकमुद्रणासाठी भालचंद्र चिद्दरवार व चंद्रकांत तम्मेवार ह्यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे.

सदर पुस्तिकेतील कराओके तंत्रज्ञानाचे संकल्पनेवरील गीतलेखन व गायन ह्यामुळे भक्तीसंप्रदाय व कन्यका भक्तांनां भक्तीचे एक नवे दालन खुले करुन देणाचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात अशी साहित्य निर्मिती व कराओके भक्तीगीत गायनाला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास लेखिका साधना बंडेवार ह्यांनी व्यक्त केलेला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाऊंची आठवण

Tue Sep 24 , 2024
भाऊंचे जाणे तेव्हाही अखरले होते. आजही अखरतेय. क्वचित एखादाच भाऊ होऊ शकतोय. भाऊ लोखंडे होते तसेच ! स्मरणीय .. अविस्मरणीय ..! जीवन जर सामाजिकतेचे क्रमशः पृष्ठ असेल तर ते वाचावेच लागेल. भाऊ लोखंडे हे लक्षवेधी असे स्वर्णिम पृष्ठ होते. वेधक, उदबोधक अन् भेदक सुध्दा ! कोवीड काळात २२ सप्टेंबर २०२० ला त्यांचे निधन झाले. चार वर्षे होऊन गेली. ती फार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com