यवतमाळात मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी

– शहरातील १ हजार ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

– प्रा.एकबोटे यांच्या जनजागृती गिताचे विमोचन

यवतमाळ :- मतदार जनजागृतीसाठी यवतमाळ विधानसभा मतदासंघाच्यावतीने विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी तयार करून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील एक हजार ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी उत्फूर्तपणे सहभागी झाले होते.

यवतमाळचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकूल येथे करण्यात आले होते. यावेळी यवतमाळ व दिग्रस विधानसभा मतदारसंघाच्या सामान्य निरिक्षक ए.देवसेना, तहसीलदार योगेश देशमुख, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, सहाय्यक ट जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, नायब तहसिलदादर रुपाली बेहरे, सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर गोळे, विस्तार अधिकारी पप्पू भोयर, नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी विनोद डवले, प्रा.डॉ.राहुल एकबोटे आदी उपस्थित होते.

लोकशाही अधिक मजबूत व समृद्ध करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकास मतदानाचे महत्व पटवून देण्यासोबतच त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानुसार यवतमाळ येथे आज विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीद्वारे मतदानाचा संदेश देण्यात आला.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात शहरातील विविध शाळांचे एक हजार ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करत भारत निवडणूक आयोगाचे चिन्ह व 78 YAVATMAL VOTE असा विहंगम आकार साखळीद्वारे तयार केला.

यवतमाळ येथील प्रसिद्ध गायक व अमोलकचंद महाविद्यालयातील संगीत विभागाचे प्राध्यापक डॉ.राहुल एकबोटे यांनी मतदार जनजागृतीसाठी तयार केलेल्या गिताचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या गिताचे सादरीकरण देखील यावेळी प्रा.एकबोटे यांनी केले.

कार्यक्रमात अँग्लो हिंदी हायस्कूल, लोकनायक अणे विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय,अभ्यंकर विद्यालय, वेदधारणी स्कूल, रमाबाई आंबेडकर विद्यालय, उर्दू शाळा, महिला विद्यालय, साई विद्यालय, जिल्हा परिषद स्कूलचे विद्यार्थी सहभाग झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षण जितेंद्र सातपुते, संजय कोल्हे, पंकज शेलोटकर, सचिन भेंडे, संजय सातारकर, पियुष भुरचंडी, अनवर,अजय मिरकुटे, संजय बट्टावार, संजय दंडे,अजय राऊत, मुकुंद हम्मन, मोहन शहाडे, मनीष डोळसकर यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बालदिनाला पथनाट्यातून मतदान व बाल हक्क बाबत जनजागृती

Sat Nov 16 , 2024
गडचिरोली :- 14 नोव्हेंबर बाल दिन निमित्त महिला व बाल विकास विभाग, गडचिरोली व फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, गडचिरोली यांच्यावतीने दिनांक 14 नोव्हेंबर 2024 ला गांधी चौक व बस स्थानक परिसरात मतदान व बाल हक्क जनजागृती या विषयावर पथनाट्य आयोजन करण्यात आले होते. पथनाट्याच्या माध्यमातून बालकांचे हक्क आणि मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. स्वीप समितीचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!