संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 12 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे अनुशंगाने ग्रामीण जीवोन्नती अभियान पंचायत समिती कामठी अंतर्गत आज 12 ऑगस्टला स्वयं.समुहांनी उत्पादित केलेल्या वस्तूची विक्री करण्यासाठी व उत्पादन,उत्पादक समूह यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे च्या मुख्य उद्देशाने कामठी तहसील कार्यालयात स्टॉल लावण्यात आले.
या प्रदर्शनी व स्टॉल चे उदघाटन तहसीलदार अक्षय पोयाम व ,गट विकास अधिकारी अंशुजा गराटे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आली.
याप्रसंगी विस्तार अधिकारी मनीष दिघाडे, कृषी विस्तार अधिकारी शुभांगी कामडी, पशुधन अधिकारी आदी उपस्थित होते याप्रसंगी मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी वस्तू ,उत्पादन या संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले.तर तहसील कार्यालयात लागलेल्या या बाजारपेठेचा नागरिकांनी लाभ घेतला.