मराठी लेखनात कणेकरी बाज रूजविणारा लेखक गमावला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने खुमासदार लेखन करणारा शब्दप्रभू लेखक गमावला आहे. त्यांनी मराठीत कणेकरी बाजाचे लेखन रूजविले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, “शिरीष कणेकर हे चित्रपट, क्रिकेटचे एका अर्थाने माहितीकोश होते. एखादा प्रसंग रंजक करून कसा सांगायचा, यावर त्यांची हुकूमत होती. शब्दांवर त्यांची एवढी पकड होती की कोणताही प्रसंग ते शब्दांतून चित्रमय करू शकत. त्यांच्या लेखनात कायम कणेकरी बाज दिसायचा. त्यांच्या निधनाने समकालावर वैशिष्ट्यपूर्ण भाष्य करणारा भाष्यकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'दिलखुलास' कार्यक्रमात कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांची मुलाखत

Tue Jul 25 , 2023
मुंबई :- कांदळवने वाढावी म्हणून जगभर प्रयत्न केले जात आहेत. ही झाडे पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक असून नैसर्गिक संरक्षक भिंत म्हणून कार्य बजावतात. कांदळवनाचे महत्व लक्षात घेवून त्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून राज्याच्या कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी केले आहे. कांदळवने हे सागरी परिसंस्थेचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com