नवी दिल्ली :- 98 वेळ अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर होत आहे. त्या निमित्ताने आज राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी खासदार नरेश मस्के साहित्य संमेलनाचे निमंत्रक सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार आणि समन्वयक डॉक्टर शैलेश पगारिया उपस्थित होते.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सामंत म्हणाले, राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आढावा घेण्यासाठी आज दिवसभर राजधानीत असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. त्याच्यामुळे त्यांची भेट घेणे क्रमप्राप्त आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहे. या सर्व नियोजनाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आज पवार यांची भेट घेतली असल्याचे सांगितले.