विभागीय आयुक्त कार्यालयात ‘मराठी भाषा पंधरवडा’ साजरा

– विविध स्पर्धांचे आयोजन आणि उत्स्फूर्त सहभाग

नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात आज विविध स्पर्धांचे आयोजन करून मराठी भाषा पंधरवडा साजरा झाला. या या कार्यक्रमात विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.

आयुक्तालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन अपरआयुक्त सामान्य प्रशासन प्रदीप कुलकर्णी यांच्या हस्ते आणि प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतीयेळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या संयोजक तथा सहायक आयुक्त भूसुधार शिल्पा सोनुले, तहसीलदार संदीप माकोडे, स्पर्धेचे परीक्षक अध्यापक महाविद्यालयाचे प्रा.डॉ. शैलेश गायकवाड आणि वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाच्या प्रा. पल्लवी कर्वे यावेळी उपस्थित होत्या.

प्रदीप कुलकर्णी आणि दिपाली मोतीयेळे यांनी मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठीतील विविध भाषा व्यवहार आणि मराठीच्या संवर्धनासाठी आवश्यक प्रयत्न याबाबत विचार मांडले.

मराठी भाषेच्या महत्वावर आधारित निबंध लेखन स्पर्धा, प्रशासकीय व न्यायालयीन शब्दांवरील प्रश्न मंजुषा, शुद्ध लेखन आणि कविता वाचन स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. विभागीय आयुक्तालयातील विविध विभाग, लेखा व कोषागारे,नागरी हक्क संरक्षण, पोलीस,वने,सार्वजनिक बांधकाम आदी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. संदीप माकोडे यांनी सूत्रसंचालन केले तर शिल्पा सोनुले यांनी आभार मानले.

उद्या २८ जानेवारी रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर होणार असून बक्षीस वितरण होईल.

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या महाराष्ट्र शासनाच्या मुख्य धोरणानुसार शासकीय कार्यालयांमध्ये १४ ते २८ जानेवारी दरम्यान दरवर्षी मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात येतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सोमलवाडा (मनीष नगर) आरयुबीचा लोकार्पण समारंभ आज

Tue Jan 28 , 2025
– मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार उदघाटन नागपूर :- नागपूर शहरातील मनीषनगर येथील रेल्वे अंडर ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्याचे उदघाटन उद्या म्हणजेच २८ जानेवारी मंगळवार रोजी संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली या रेल्वे अंडर ब्रिजचा उदघाटन सोहळा पार पडेल. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!