संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सकारात्मक आणि विधायक जीवनपद्धतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन ,त्याचा विकास बौद्ध धम्मात अंतर्भूत आहे.जगातील अनेक वैज्ञानिक सिद्धांत बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाशी संबंधित आहेत.असे मौलिक प्रतिपादन माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी बुद्ध जयंती निमित्त येरखेडा येथील बुद्ध धम्म संदेश समितीच्या वतीने धम्महाविरानुवत्र बुद्ध विहारात आयोजित भव्य कँडल मार्च कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
या भव्य कॅन्डल मार्च ची सुरुवात भन्ते विनयशील यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला दीपप्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करून करीत विशेष बुद्ध वंदना घेऊन करण्यात आले . यावेळी नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत, नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे, अखिलेश ठाकूर, पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी, येरखेडा ग्रामपंचायत च्या सरपंच सरिता रंगारी ,उपसरपंच मंदा महल्ले पाटील,समाज सेवक कृष्णकुमार भगत , प्रशांत काळे,बुद्ध धम्म संदेश समितीचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष गौतम तपासे, उपाध्यक्ष सुमेध दुपारे, सचिव गौतम पाटील,सहसचिव कुलदीप पाटील ,विनोद बावनगडे ,तरुण घडले ,कमलेश बागडे ,भरत सहारे ,योगेश भगत ,अशीत बावनगडे, आशिष मेंढे, कपिल माने ,नवनीत सहारे ,विलेश वाघमारे ,सुरेंद्र थुल ,ग्रामपंचायत सदस्य प्रिया दुपारे, ज्योती घडले, निकिता पाटील ,राणी पवनीकर ,कल्पना तांबे यासह संपूर्ण सहयोगी महिला मंडळ,सल्लागार समितीचे चंद्रपाल सहारे , डॉ पृथ्वीराज देशमुख ,भगवान पाटील, किरण लांजेवार, अतुल धोंगडे, सुदेश नितनवरे ,मनोहर मोटघरे ,अनिल बनकर, नितेश यादव ,आशिष अंबादे ,विकास गजभिये, शंकर भुजाडे, नितीन इरपाचे ,राजकुमार पिल्लेवान, दीपक पांडे ,प्रवीण लुटे ,प्रवीण भाईदे सह समस्त सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते. हे कॅडल मार्च झेंडा चौक ,शिवपंचायत मंदिर ,दुर्गा चौक, टीचर कॉलनी ,रामकृष्ण लेआउट ,तारा माता चौक ,प्रीती लेआउट ,दुर्गा सोसायटी, उपासे लेआउट मार्गे नगर भ्रमण करीत धम्महाविराणूवत्र बौद्ध विहारात समापन करण्यात आले. ठिकठिकाणी नागरिकांनी कॅण्डल मार्च चे स्वागत करून प्रसादाचे वितरण केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील यांनी केले संचालन गौतम पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन सुमेध दुपारे यांनी मांनले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.भव्य भोजनदान वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.