नागपूर, ता १६ : श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त म. न. पा केंद्रिय कार्यालयातील मुख्य दालनात रविदास महाराज यांच्या तैलचित्राला महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, अति.आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन व रविन्द्र भेलावे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्या साहब बिघाणे, समाजातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.