महसूल क्रीडा स्पर्धांसाठी मानकापूर क्रीडा संकुल सज्ज, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली पाहणी

नागपूर :- नागपूर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन उद्यापासून नागपूर येथे होत असून या स्पर्धांसाठी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल विविध सुविधांनी सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज क्रीडा स्पर्धा आयोजनाची तयारी व व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, उपजिल्हाधिकारी शेखर गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते.            शनिवार व रविवार या दोन दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धेत नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यातील महसुल विभागाचे सुमारे 1500 अधिकारी-कर्मचारी स्पर्धक भाग घेत आहेत. स्पर्धेच्या आयोजन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवावर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधल्याचे समाधान - शरद पवार

Sat Feb 25 , 2023
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आज शरद पवारांची घेतली भेट ;तुम्ही मला म्हातारा समजता का? असे शरद पवार बोलताच एकच हंशा… एखाद्याच्या भाषणावर हरकत घेणे म्हणजे कळत-नकळतपणे त्याला जातीय रंग देण्याचा हा प्रयत्न आहे… जात,पात,धर्म या चुकीच्या गोष्टींकडे आपला प्रचार वळवण्याचे काम भाजपसाठी नवे नाही… https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 मुंबई – एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे आदरणीय शरद पवार यांची भेट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com