– ४ ते ८ ऑगस्ट दरम्यान आयोजन,जागर श्रावणाचा, उत्सव नारीशक्तीचा
नागपुर :- मातृभूमी सेवा फाऊंडेशन मध्य नागपूर द्वारे आमदार प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून निर्मित वंदनीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त महिलांसाठी भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन शनिवार १७ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आले असून या स्पर्धेत ११ उत्कुष्ट मंडळांना रोख पुरस्कार, श्रावण क्वीन, उत्कृष्ट निवेदक, असे अनेक पुरस्कार देण्यात येणार आहे.या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या महिलांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ४-८ ऑगस्ट दरम्यान आयोजित असून यात रविवार ४ ऑगस्ट रोजी स्व. राजे तेजसिंगराव भोसले सभागृह तुळशीबाग महाल, आणि बुध/गुरुवार ७ व ८ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णासाहेब साठे सभागृह, मस्कसाथ बारईपुरा येथे दुपारी १-४ या वेळेत आयोजित केले असून स्पर्धेत महिलांना १० मिनिटात आपले सादरीकरण करायचे असून तज्ञ प्रशिक्षकंद्वारे द्वारे मंगळागौरी निमित्य महिलांचे पारंपरिक गीत ,खेळ, सांस्कृतिक उपक्रम, यांचे प्रशिक्षण देण्यात येईल.
या स्पर्धेसाठी अर्चना डेहनकर ,सरिका नांदुरकर, रेखा निमजे, कविता इंगळे ,श्वेता निकम (भोसले), निकीता पराये, नंदांवर, अनिता कशिकर, रजनी जैन ,करुणा गावंडे, माय ठवळी,मंजुषा मोहिते , वंदना डीवरे, पदाधिकारी परिश्रम घेत असून ज्या महिलांना या स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल त्यांनी दिलेल्या स्थळी संपर्क साधावा, असे आव्हाहन आयोजक डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केले आहे.