नागपूर :- नागपूर विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन पदव्यूत्तर विभागातील विद्यार्थी तसेच संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोगेंद्रनाथ मंडल यांचा 55 वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
मूळ बंगालचे असलेले जोगेंद्रनाथ मंडल यांनी 1946 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेड्युल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून संविधान सभेत निवडून पाठवले होते. परिणामतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी संविधान बनवले. म्हणून संविधान कर्त्याला सहकार्य करणाऱ्या व त्यांच्या पाठीशी उभे असलेल्या जोगेंद्रनाथ मंडल यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
विभाग प्रमुख प्रो डॉ नीरज बोधी यांनी जोगेंद्रनाथ मंडल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. या विभागातील माजी विद्यार्थी उत्तम शेवडे यांनी जोगेंद्र नाथांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. किशोर भैसारे यांनी सूत्रसंचालन तर सचिन देव यांनी समापन केले.
याप्रसंगी प्रामुख्याने ज्येष्ठ प्रा डॉ तुलसा डोंगरे, प्रा सरोज वाणी, प्रा ममता सुखदेवे, माजी न्यायमूर्ती परशराम पाटील, विजय वासनिक, केशव मेश्राम, शुभांगी वासिनीक-देव, प्रवीण कांबळे प्रणय वाळके, सुरेश हाडके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.