अमरदिप बडगे
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील केसलवाडा येथील मानवता हायस्कूल केसलवाडा येथील सत्र 2021-2022 या सत्रातील दहावीचा नुकताच निकाल घोषित झाला असुन सुहानी गोपाल सोनेवाने 86.40%टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर व्दितीय क्रमांक आदित्य ओमप्रकाश भेलावे व शिवम भरत बडवाईक दोन्ही विद्यार्थ्यांनी 84.40% टक्के घेतले.तर तेजस प्रमोद मलेवार 84% टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकावला तर शाळेचा एकुण निकाल 98.20% लागला आहे.गुणवंत विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक आर.वाय.उपरकर, ज्येष्ठ शिक्षक एम.बी.पटले,व सर्व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.