तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळयांचे व्यवस्थापन

नागपूर :- यंदा चांगले पाऊसमान असल्यामुळे तुरीचे पीक चांगले आले आहे व येत्या पंधरवड्यात हे पिक फुलो-यावर येईल. शेतकरी बंधुना तूर पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र मागील आठवडयातील असणारे रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे व अशा वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणा-या अळयापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधुनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक आहे. शेंगा पोखरणा-या अळयांमध्ये खालील प्रकारच्या अळयांचा समावेश होतो…

शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा) – या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंडयातून निघालेल्या अळया तुरीच्या कळया आणि फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मि. लांब, विविध रंग छटेत दिसुन येते. जसे पोपटी, फिक्कट गुलाबी व करडया रंगाची असून तिच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठया अळया शेंगाना छिद्र करून आतील दाणे पोखरुन खातात.

पिसारी पतंग – या पतंगाची अळी १२.५ मि.मि. लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सूक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते व बाहेर राहून दाणे पोखरते.

शेंगे माशी – या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढ-या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडावरील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाने अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.

एकात्मिक व्यवस्थापन

या तिनही किडी कळया, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात.

१. प्रति हेक्टर २० पक्षी थांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडींच्या अळया खाऊन फस्त करतात.

२. पहिली फवारणी : (५० टक्के फुलो-यावर असतांना) निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली किंवा एच.ए.एन.पि.व्ही. (१x१० पिओबी/मिली) ५०० एल.ई./हे. किंवा बॉसिलस थुरिनजिऍसिस १५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ई.सी. २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

३. दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी) इमामेक्टीन बेझोएट ५ टक्के ३ एस जी ग्रॅम किंवा लॅब्डा सायहॅलोमेथ्रीन ५ टक्के प्रवाही १० मिली किंवा ईथिऑन ५० टक्के ईसी ४ मिली किंवा क्लोरेंनट्रेनीलिप्रोल १८.५ टक्के एस.सी. प्रवाही २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४. अळयांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकुन झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळया पोत्यावर पडतील त्या गोळा करून नष्ट कराव्यात

@ फाईल फोटो

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची ओबीसी मागास वर्गीय अध्यक्षपदावर नियुक्ती त्याबद्दल प्रथम नागपूर आगमन दरम्यान भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नागपूर तर्फे विमानतळावर भव्य स्वागत .

Sat Dec 3 , 2022
नागपूर :- माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची ओबीसी मागास वर्गीय अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. व आज त्यांनी पिछडा आयोग भारत सरकार दिल्ली येथे पदग्रहण सोहळा पार पडला. व दिनांक 3.12.2022 रोजी सकाळी 10.30 वाजता त्यांचे प्रथम नागपूर आगमन होत असून आज भारतीय जनता पार्टी मुख्य कार्यालय मंगलम् गणेषपेठ,नागपूर येथे भाजपा ओबीसी मोर्चा नागपूर शहर तर्फे भाजपा ओबीसी मोर्चा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!