संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 7:-सकारात्मक आणि विधायक जीवनपद्धतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन, त्याचा विकास बौद्ध धम्मात अंतर्भूत आहे. जगातील अनेक वैज्ञानिक सिद्धांत बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाशी संबंधित आहेत. आजचे विज्ञान सतत शोध आणि संशोधनाचे आहे. त्याला अंत नाही. माणूस हा धम्माचा केंद्रबिंदू आहे असे मौलिक मत भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय सचिव डॉ सत्यजित चंद्रिकापुरे यांनी काल 6 मे ला कामठी येथील जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित बुद्ध पूर्णिमा महोत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.
महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध यांच्या 2586 व्या जयंती निमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा ,शाखा कामठी च्या वतीने 5 व 6 मे ला जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बुद्ध पोर्णिमा महोत्सव आयोजित केले होते.याअंतर्गत 6 मे ला 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या उत्कृष्ट झांकी निवड पुरस्कार तसेच वक्तृत्व स्पर्धा चे विजेत्यांना पुरस्कार वितरण कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा चे नागपूर जिल्हा पूर्व अध्यक्ष सी आर सोनडवले,भारतीय बौद्ध महासभा कामठी तालुका अध्यक्ष हृदेश मलकवाडे, कामठी शहर अध्यक्ष सुगत रामटेके,ऍड सचिन चांदोरकर, रजनीताई धोंगडे, दुर्योधन मेश्राम,बौद्धाचार्य जिवाजी रामटेके,नितीन डोनेकर आदी राजकीय तसेच सामाजिक संघटना चे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
बुद्ध जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभा कामठीच्या वतीने आयोजित बुद्ध महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला असून या दोन दिवसीय बुद्ध महोत्सव अंतर्गत 5 मे ला सकाळी साडे नऊ वाजता जयस्तंभ चौकात धम्म ध्वजारोहण करण्यात आले तपश्चात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विशेष बुद्धवंदना करून तथागताना वंदन करण्यात आले तर सायंकाळी 5 वाजता तथागत गौतम बुद्ध यांचा जीवन परिचय ,बुद्ध धम्म एक वैज्ञानिक दृष्टिकोन,महापुरुषो की जयंती कैसे मनाई जाए?या तीन विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धा मध्ये विजयश्री प्राप्त वक्त्याना 6 मे ला सायंकाळी 7 वाजता प्रथम ,द्वितीय ,तृतीय पुरस्काराने सम्माणीत करण्यात आले.तसेच 14 एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीतील उत्कृष्ट झाकी ची निवड करून प्रथम ,द्वितीय व तृतीय पुरस्काराने सम्माणीत करीत इतर सहभागी मिरवणुकीच्या मुख्य प्रतिनिधींना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सम्माणीत करण्यात आले.
यानुसार उत्कृष्ट झाकी मध्ये बेस्ट झांकी म्हणून 5 हजार रुपये चा प्रथम पुरस्कार दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने कमसरी बाजार कामठी चे पंचशील बौद्ध विहार च्या झांकी प्रतिनिधी ला देण्यात आले.द्वितीय पुरस्कार संजय गांधी निराधार रोजना कामठी चे माजी अध्यक्ष प्रमोद खोब्रागडे यांच्या वतीने 3 हजार रुपये चा पुरस्कार कुंभारे कॉलोनी कामठी चे बोधिवृक्ष वाचनालयच्या झांकी प्रतिनिधी ला देण्यात आले. तसेच तृतीय पुरस्कार ही देण्यात आले.तसेच वक्तृत्व स्पर्धेत वयोगटातील वय 31 ते 65 वर्षे वयोगटातील विजयी झालेले माजी नगरसेवक विकास रंगारी यांना प्रथम पुरस्कार,मिथुन चांदोरकर ला द्वितीय तसेच शालीकराम अडकणे ला तृतीय पुरस्कार देण्यात आले तसेच 30 वर्षे पर्यंत च्या वयोगटात निवड झालेले प्रथम पुरस्कार कु.अलिशा निकोसे, द्वितीय पुरस्कार कु.शगुण आशिष मेश्राम,तर तृतीय पुरस्कार आयुष वहाने ला देण्यात आले.
.या दोन दिवसीय बुद्ध पूर्णिमा महोत्सवच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा चे शहराध्यक्ष सुगत रामटेके,रजनीताई धोंगडे,दुर्योधन मेश्राम,जीवाजी रामटेके, नितीन डोनेकर,अजय भालेकर,आरजु कांबळे,संग्राम संनकाळे, दीपाली गजभिये,अभिजित मेश्राम, मालती ताई साखरे,देवांगणा गजभिये,प्रज्ञाताई तांबे,राहुल पाटील,नितेश टेंभेकर,विद्यानंद खोब्रागडे,संघदीप बेलेकर, रवीजय नगरारे,गुलाब खोब्रागडे, मंगेश मेश्राम, भीमराव नंदेश्वर, सुरज गोडबोले,प्रफुल सवाईथुल आदींनी मोलाची कामगिरी राबविली.