संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आदर्श नगर रणाळा येथे एका विवाहित इसमाने घरात कुणी नसल्याचे संधी साधून घरात नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल 15 ऑगस्ट ला सायंकाळी 6 दरम्यान घडली असून मृतकाचे नाव सुरेश सेलोकर वय 50 वर्षे असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.घटनास्थळाहुन एक सुसाईड नोट मिळाली मात्र त्यामध्ये आत्महत्या करण्याचे कारण नाही पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे मृतकाच्या पाठीमागे आई,पत्नी व एक मुलगा असा आप्तपरिवार आहे