संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- तालुक्यातील येरखेडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी (३०) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे, सहायक गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले यांनी अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या कार्याची माहिती मनोगतातून दिली. या निमित्त शासन निर्णयानुसार समाजासाठी योगदान देणाऱ्या दोन महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारासाठी समाजासाठी झटणाऱ्या येरखेडा गावातील महिलांच्या कार्य कौशल्याचा विचार करून, दोन महिलांची निवड केली. यात मालती राजेश गाजीमवार व संगीता प्रदीप मेश्राम या दोन महिला अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. त्यांना पंचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे आणि येरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सरीता रंगारी, उपसरपंच मंदा महल्ले यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी गोपीचंद कतुरे, ग्राम विकास अधिकारी जितेंद्र डवरे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना सोनेकर, रोशनी भस्मे, रशिदा बेगम, नजिष परवीन, राजश्री घिवले, गीता परतेकी, अनिल पाटील, नरेश मोहबे, कुलदीप पाटील, मो. इमरान नईम यांच्यासह सय्यद गुफरान, सचिन भस्मे, गजानन तिरपुडे व अंगणवाडी सेविका आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.